पाकिस्तान क्रिकेटला 'अच्छे दिन'! हा परदेशी संघ येणार दौऱ्यावर

न्यूझीलंडचा (New Zealand) संघ डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 दरम्यान दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan) जाणार आहे.
New Zealand Vs Pakistan

New Zealand Vs Pakistan

पाकिस्तान क्रिकेटला परत चांगले दिवस येताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय संघ या देशाचा दौरा करण्यासाठी तयारी करत आहेत. या अंतर्गत न्यूझीलंडचा (New Zealand) संघ डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 दरम्यान दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan) जाणार आहे. त्यानंतर 2023 च्या अखेरीस पाकिस्तानमध्ये 10 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळवले जातील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 20 डिसेंबर रोजी ही माहिती दिली. किवी संघ 2021 साली पाकिस्तानचा दौरा करणार होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव शेवटच्या क्षणी ही मालिका पुढे ढकलण्यात आली.

आता न्यूझीलंड (New Zealand) 2023 च्या दौऱ्यावरही या मालिकेची भरपाई करेल. प्रस्तावित दौऱ्यावर न्यूझीलंडचा संघ एप्रिलमध्ये पाकिस्तानमध्ये पाच एकदिवसीय आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. मात्र तारखा आणि ठिकाणे अजून जाहीर झालेली नाहीत.

<div class="paragraphs"><p>New Zealand Vs&nbsp;Pakistan</p></div>
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चेतेश्वर पुजाराने केला मोठा दावा

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले, न्यूझीलंड पहिल्यांदा डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानात येत आहे. पाकिस्तान आणि न्यूझिलंड यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जातील जे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (World Test Championship) भाग असतील. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे. 2023 मध्ये भारतात (India) होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रतेसाठी जाणाऱ्या सुपर लीगचा हा एक भाग आहे. पाकिस्तानी बोर्डाने पुढे सांगितले की, पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मार्टिन स्नेडॉन यांच्याशी याबाबत सतत चर्चा केली. त्यानंतर या भेटींवर एकमत झाले आहे.

दोन्ही मंडळांनी जारी केलेली निवेदने

रमीझ राजा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'आमच्या संभाषणाच्या निकालाने मी खूश आहे आणि मार्टिन स्नेडॉन आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डाचे सहकार्य आणि समजूतदारपणाबद्दल आभार मानतो. प्रमुखांमध्ये दुबईमध्ये झालेल्या चर्चेचे फलित समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांमधील संबंध दृढ होतील.

<div class="paragraphs"><p>New Zealand Vs&nbsp;Pakistan</p></div>
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार

चार संघांचा पाकिस्तान दौरा निश्चित

न्यूझीलंडचा दौरा निश्चित झाल्यामुळे पाकिस्तान आता ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड यांचेही यजमानपद भूषवणार आहे. मार्च 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत हे संघ येथे येतील. त्यांच्यासोबत पाकिस्तानसाठी एकूण 8 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळवले जातील. 2009 मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परदेशी संघांनी पाकिस्तानचा दौरा केला नाही. त्यामुळे पाकिस्तानला सहा वर्षे घराबाहेरील सामने खेळावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com