India vs South Korea Volleyball
India vs South Korea VolleyballTwitter

Asian Games Volleyball: भारताने बलाढ्य द. कोरियाला पाजलं पाणी, बाद फेरीतही दणक्यात प्रवेश

Asian Games: भारताच्या व्हॉलिबॉल संघाने गत रौप्य पदक विजेत्या दक्षिण कोरिलाया पराभूत करत बाद फेरी गाठली आहे.
Published on

Indian men's volleyball team beat South Korea to enter knockout round of 19th Asian Games Hangzhou:

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. पण असे असले तरी या स्पर्धेतील काही क्रीडा प्रकारांना 19 सप्टेंबरपासूनच सुरुवात झाली आहे, या व्हॉलिबॉलचाही समावेश आहे.

पुरुषांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरीची नोंद केली आहे. बुधवारी भारतीय संघाने गत रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाला पराभवाचा दणका दिला.

लिनपिंग स्पोर्ट्स सेंटर जिमनॅशियम येथे झालेल्या या सामन्यात भारताने तीन वेळच्या चॅम्पियन दक्षिण कोरियाला 3-2 असे पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे.

India vs South Korea Volleyball
Asian Games 2023: पाऊस भारताच्या पथ्यावर, सामना रद्द होऊनही महिला क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये!

हा सामना तब्बल 2 तास 23 मिनिटापर्यंत झाला, तसेच 5 सेटचा झाला. या 5 सेटमध्ये भारताने 25-27, 29-27, 25-22, 20-25, 17-15 अशा फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने ग्रुप सी मध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. भारताने यापूर्वी मंगळवारी कंबोडियाविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला होता.

दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात भारताकडून अमित गुलिया आणि अश्वल राय यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.

India vs South Korea Volleyball
Asian Games: BCCI ची मोठी घोषणा! दोन्ही भारतीय संघात केले महत्त्वाचे बदल, पाहा संपूर्ण टीम

आता भारताचा पुढील सामना तैवान किंवा मंगोलिया विरुद्ध होऊ शकतो. तैवान आणि मंगोलिया यांच्यात 21 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघाबद्दल माहिती मिळेल.

दरम्यान भारतीय संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत 37 वर्षांपासून व्हॉलिबॉलमध्ये पदकाची प्रतिक्षा आहे. यापूर्वी भारताने 1986 साली व्हॉलिबॉलमध्ये पदक मिळवले होते. त्यावेळी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्य पदकाला गवसणी घातली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com