गोव्याचा पुरुष बास्केटबॉल संघ.
गोव्याचा पुरुष बास्केटबॉल संघ.Dainik Gomantak

National Basketball: गोव्याच्या पुरुष बास्केटबॉल संघाची घोडदौड; मेघालयसह बलाढ्य हरियानाला धक्का

Senior National Basketball Championship 2023: महिलांनीही नोंदविला विजय
Published on

Senior National Basketball Championship 2023: पंजाबमधील लुधियाना येथे सुरू असलेल्या ७३व्या राष्ट्रीय सीनियर बास्केटबॉल स्पर्धेत गोव्याच्या पुरुष संघाने विजयी घोडदौड राखताना मंगळवारी मेघालय, तसेच बलाढ्य हरियानाला पराभूत केले. राज्याच्या महिला संघानेही विजयाची चव चाखली.

गोव्याचा पुरुष बास्केटबॉल संघ.
IND vs AUS: 'अंपायरने त्यांचं काम केलं...', शेवटच्या ओव्हरमधील नाट्यमय घटनांनंतर हेडनचा पक्षपाताचा आरोप

गोव्याच्या पुरुष संघाने क गटात मेघालयाचा ६७-३३ असा धुव्वा उडविला. उंचपूऱ्या शिवा याने उंचीचा लाभ उठवत १७ गुणांची नोंद केली. गौरव सिंग याने १३, तर अखिल जेकब याने १० गुणांसह त्याला चांगली साथ दिली.

याशिवाय जेशुआ पिंटो, तनीष लोटलीकर व महिपाल सिंग यांनी प्रत्येक सहा गुण नोंदीत केले.

दिवसभरातील सलग दुसरा सामना जिंकताना गोव्याच्या पुरुष संघाने हरियानाला ८६-७२ गुणफरकाने चकीत केले. कर्णधार जेशुआ पिंटो बचावात कणखर ठरला. शिवाय त्याने २१ गुणांची नोंदही केली.

याशिवाय गौरव याने १८, तर महिपालने ३ पॉईंटरसह १६ गुण नोंदविले. गोव्याचा संघ आता गटात अव्वल स्थानी आहे.

गोव्याच्या महिलांनी स्पर्धेतील पहिला सामना जिंकताना झारखंडला ४५-३६ असे नमविले. सारा हुसेन हिने १५, शिमेई नॅथन हिने १०, तर अतिका सुरिया हिने ८ गुण नोंदविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com