महाराष्ट्रीयन असल्याने अन्याय झाला म्हणत... 'या' खेळाडूने व्यक्त केली खंत

देशाला नौकानयन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील (Maharashtra) दत्तू भोकनळ (Dattu Bhokanal) वर शेती करण्याची वेळ आली आहे.
Dattu Bhokanal
Dattu BhokanalDainik Gomantak
Published on
Updated on

देशाला नौकानयन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील (Maharashtra) दत्तू भोकनळ (Dattu Bhokanal) वर शेती करण्याची वेळ आली आहे. हे ऐकायला आणि वाचायला विचित्र वाटत असेल मात्र हे कटू सत्य आहे. 2020 मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) प्राप्त भोकनळने आपल्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर त्याने फेडरेनशविरुध्द गंभीर आरोपही केले आहेत. महाराष्ट्रामधील असल्याने माझ्यावर अन्याय झाला असल्याचे त्याने सांगितले आहे.

दत्तू भोकनळकर म्हणाला, ''माझ्यापेक्षा अधिक वेळ घेणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली. मला मात्र पात्रता फेरीमध्ये भाग घेण्यासाठी साधी परवानगीसुध्दा दिली नाही. परंतु कोणतेही कारण न सांगता मला शिबिरामधून हाकलून देण्यात आले.'' 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देवून दत्तूचा गैारव केला होता.

Dattu Bhokanal
युरो कप फुटबॉल स्पर्धेचा थरार 12 जूनपसून रंगणार

जाणून घ्या दत्तूची कामगिरी

काही दिवसांपूर्वीच दत्तूने सैन्यातील नायब सुभेदार पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्याला पात्रता फेरीमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. 2014 मध्ये दत्तूने राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदके जिंकली होती. 2015 मध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये (Asian Championships) दत्तूला रौप्य पदक आणि त्यानंतरच्या वर्षी चीनमध्ये पार पडलेल्या 16 व्या आशियाई रोइंग स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले. 2016 मध्ये याच कामगिरीच्या जोरावर रिओ ऑलिम्पिकमध्ये (Rio Olympics) भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दत्तू हा भारताकडून रोइंग स्पर्धेत खेळणारा तो एकमेव खेळाडू होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com