Nitu Ghanghas नंतर Saweety Boora ने जिंकले सुवर्णपदक, चीनी खेळाडूला पाजले पाणी

Womens World Boxing Championship, Saweety Boora: महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नीतू घंघासनंतर आता स्वेटी बूराने सुवर्णपदक जिंकले आहे.
Saweety Boora
Saweety BooraDainik Gomantak
Published on
Updated on

Womens World Boxing Championship, Saweety Boora: महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नीतू घंघासनंतर आता स्वेटी बूराने सुवर्णपदक जिंकले आहे.

स्वेटी बूरा हिने 81 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात चीनच्या वांग लीनाचा पराभव केला. अशाप्रकारे भारताचे हे आजच्या दिवसातील दुसरे सुवर्णपदक आहे.

याआधी नीतू घंघासने मंगोलियन बॉक्सरचा पराभव करुन भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. आता स्वेटी बूराने चीनच्या खेळाडूला हरवून दुसरे सुवर्णपदक भारताच्या झोळीत टाकले आहे. त्याचवेळी, याआधी नीतू घंघासने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

Saweety Boora
Womens World Boxing Championship: केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नीतू घंघासचे केले अभिनंदन, म्हणाले...

नीतू घंघास हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले

भारतीय बॉक्सर नीतू घंघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीतू घंघासने 48 किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्साईखान अल्तानसेतसेगचा पराभव केला.

भारतीय बॉक्सरने हा सामना 5-0 असा जिंकला. तत्पूर्वी, शनिवारी नीतू घंघासने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या (Kazakhstan) बॉक्सरचा पराभव केला. त्याचवेळी स्वेटी बूराने भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

Saweety Boora
Women's Boxing Championships: भारताच्या निखत, नीतू, लवलिनाची फायनलमध्ये धडक! पदकही पक्के

निकहत जरीन आणि लोव्हलिना बोरहगेन रविवारी अंतिम फेरीत प्रवेश करतील

निकहत जरीन आणि लोव्हलिना बोरहगेन यांनीही महिलांच्या जागतिक बॉक्सिंग (Boxing) चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

निकहत जरीन आणि लोव्हलिना बोरहगेन 26 मार्च रोजी अंतिम फेरीत भिडतील. अशा प्रकारे, 4 भारतीय बॉक्सर महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करु शकले.

नीतू घंघास व्यतिरिक्त, स्वीटी बूरा, निकहत जरीन आणि लोव्हलिना बोर्हेगन यांनीही अंतिम फेरी गाठली. मात्र, नीतू घंघास आणि स्वेटी बूरा यांच्यानंतर आता भारतीय चाहत्यांच्या नजरा निकहत जरीन आणि लव्हलिना बोर्हेगन यांच्यावरही असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com