Colombia Football: काळीज हादरवणारी घटना! 22 वर्षीय फुटबॉलरचे अर्जेंटिनात ट्रेनिंगदरम्यान निधन

कोलंबियाच्या 22 वर्षीय फुटबॉलपटूचे अर्जेंटिनामध्ये सराव करत असताना अचानक खाली कोसळून निधन झाले.
Andres Balanta
Andres BalantaDainik Gomantak
Published on
Updated on

Colombia Football: एकिकडे कतारमध्ये फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 सुरू असताना दुसरीकडे एक वाईट बातमी समोर आली आहे. कोलंबियाचा फुटबॉलपटू आंद्रे बलांटा याचे मंगळवारी निधन झाले आहे.

मिडफिल्डर असलेला 22 वर्षीय बलांटा (Andres Balanta) अर्जेंटिनामधील फर्स्ट डिव्हिजन क्लब ऍटलेटिको टुकुमन संघाच्या सराव सत्रावेळी अचानक जमीनीवर कोसळला. त्यामुळे त्याला तातडीने टुकुमन हेल्थ सेंटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले होते. संघाच्या मेडिकल स्टाफनेही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते त्याचा जीव वाचवू शकले नाहीत.

Andres Balanta
FIFA World Cup 2022: खेळाडू देतायेत विविध संदेश, पण शांततेत!

त्याला नंतर सेंट्रो द सलौद हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण त्याच्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. तो जेव्हा कोसळला तेव्हा ऍटलेटिको टुकुमनचे हंगामापूर्वीचे दुसरे सराव सत्र सुरू होते.

बलांटा 2021 साली जुलैमध्ये ऍटलेटिको टुकुमन संघात सामील झाला होता. तो 20 वर्षांखालील विश्वचषकातही 2019 साली कोलंबियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला होता.

त्याच्या निधनाबद्दल ऍटलेटिको टुकुमन क्लबने त्याच्या कुटुंबियांना कळवले आहे. तसेच पत्रकार परिषदेत क्लबने सांगितले की त्यांनी सर्व तयारी करून ठेवली असून शक्य तितक्या लवकर त्याचे कुटुंबिय त्याचे पार्थिव घेऊन जाऊ शकतात.

तसेच रिपोर्ट्सनुसार बलांटाला यापूर्वी 2019 मध्ये देखील असा त्रास झाला होता. त्यावेळही त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्याला ग्लुकोज कमी झाल्याने चक्कर आली होती. पण त्याचे वैद्यकिय रिपोर्ट्समध्ये काहीही असामान्य लक्षणे आढळली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com