India Open 2024: सात्विक-चिराग जोडीचा पुन्हा डंका, दुसऱ्यांदा फायनलमध्ये! एचएस प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty: भारताची बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना आता घरच्या प्रेक्षकांसमोर विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.
Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty
Satwiksairaj Rankireddy - Chirag ShettyAFP
Published on
Updated on

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty into the India Open 2024 final:

दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरु असलेल्या इंडिया ओपन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

शनिवारी सात्विक आणि चिराग यांच्या जोडीने मलेशियाची जोडी आरोन चिया आणि सोह वुई यिक यांना उपांत्य फेरीत 21-18, 21-14 अशा फरकाने पराभूत केले. यासह सात्विक आणि चिराग यांनी सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यांनी गेल्याच आठवड्यात मलेशिया ओपन स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता, ज्यात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty
Malaysia Open 2024: सात्विक-चिराग शेवटपर्यंत झुंजले, पण चीनच्या जोडीनं फायनलचं मैदान मारत जिंकलं विजेतेपद

45 मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात पहिल्या गेममध्ये सात्विक आणि चिराग यांना आरोन चिया आणि सोह वुई यिक या जोडीने तोडीस तोड आव्हान दिले होते. पहिल्या गेममध्ये १७-१७ अशी बरोबरीही होती. पण नंतर सात्विक आणि चिराग यांनी खेळ उंचावत गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये मलेशियाच्या जोडीने आघाडी घतली होती. पण नंतर भारतीय जोडीने प्रतिकार केला आणि 13-13 अशी बरोबरी केली. नंतर आपला खेळ कायम ठेवला आणि सलग ६ पाँइंट्स जिंकत दुसरा गेमही जिंकत सामना आपल्या नावावर केला.

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty
आता मिशन गोल्ड! Satwik - Chirag ने रचला इतिहास, 'हा' कारनामा करणारी भारताची जोडी नंबर वन

आता रविवारी (21 जानेवारी) सात्विक आणि चिराग यांना घरच्या चाहत्यांसमोर दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याची संधी असणार आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्येही या स्पर्धेत पुरुष दुहेरीत विजेतेपद जिंकले होते. आता त्यांचा अंतिम सामन्यात कोरियाच्या कांग मिन-ह्युक आणि सेओ सेंग-जे या जोडीशी सामना होणार आहे.

एचएस प्रणॉय पराभूत

दरम्यान, पुरुष एकेरीत भारताच्या एचएस प्रणॉयने इंडिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्याला उपांत्य सामन्यात चीनच्या शी यू की याने 15-21, 5-21 असे 42 मिनिटात पराभूत केले. त्यामुळे प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com