Satwik-Chirag Badminton: सात्विक-चिरागची घोडदौड कायम! तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये मारली धडक

French Open finals 2024: भारताच्या सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty | French Open 2024 Badminton
Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty | French Open 2024 BadmintonX/FFBaD
Published on
Updated on

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty into the final of French Open 2024

पॅरिसमध्ये फ्रेंच ओपन सुपर 750 स्पर्धा खेळली जात असून भारताच्या आशा सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीवर अवलंबून आहेत. सात्विक आणि चिराग यांनी या स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

शनिवारी (9 मार्च) झालेल्या उपांत्य सामन्यात सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने कोरियाच्या कँग मिन ह्युक आणि सेओ सेउंग जे या जोडीचा 21-13,21-16 अशा फरकाने अवघ्या 40 मिनिटात पराभव केला.

यासह त्यांनी इंडिया ओपनधील पराभवाचा वचपाही काढला. कोरियाच्या याच जोडीने सात्विक आणि चिराग जोडीचा गेल्याच महिन्यात झालेल्या इंडिया ओपन 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव केला होता. पण सात्विक आणि चिराग यांनी फ्रेंच ओपनमध्ये मात्र त्या पराभवाची पुनरावृत्ती होऊ दिली नाही.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty | French Open 2024 Badminton
India Open 2024: शेवटपर्यंत लढले, पण सात्विक-चिरागच्या पदरी फायनलमध्ये निराशाच! कोरियाच्या जोडीला विजेतेपद

शनिवारी उपांत्य फेरीतील सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी दोन्ही गेममध्ये कोरियाच्या जोडीला वरचढ होण्याची संधी दिली नाही. दोन्ही गेममध्ये सात्विक आणि चिराग यांनी कँग मिन ह्युक आणि सेओ सेउंग जे यांचा बचाव भेदला. त्यांनी सातत्याने आक्रमक खेळ करत सामन्यात वर्चस्व ठेवलं.

आता रविवारी तौवानच्या ली जे-हुई आणि यांग पो-स्युआन या जोडीविरुद्ध सात्विक आणि चिराग यांना अंतिम सामना खेळायचा आहे. हा अंतिम सामना जिंकून यावर्षीचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी सात्विक आणि चिराग उत्सुक असतील.

यावर्षी ते त्यांचे तिसरा अंतिम सामना रविवारी खेळणार आहेत. यापूर्वी मलेशिया मास्टर्स आणि इंडिया ओपनमध्ये त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, फ्रेंच ओपनमध्ये सात्विक आणि चिराग यांची जोडी तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहचली आहे. त्यांनी यापूर्वी 2019 आणि 2022 मध्ये त्यांनी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळला होता. यातील 2019 मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर 2022 मध्ये त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली होती.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty | French Open 2024 Badminton
आता मिशन गोल्ड! Satwik - Chirag ने रचला इतिहास, 'हा' कारनामा करणारी भारताची जोडी नंबर वन

लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधूचा पराभव

दरम्यान, फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचे पुरुष एकेरीतील आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आले. त्याला कुनलावुत वितिदसर्नविरुद्ध 23-20, 13-21, 11-21 अशा तीन सेटमध्ये पराभव स्विकारावा लागला.

तसेच महिला एकेरीत पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. पण तिला उपांत्यपूर्व फेरीत तब्बल ९२ मिनिटे चाललेल्या रोमांचक सामन्यात शेन युफेईने 24-22, 17-21, 18-21 अशा फरकाने पराभूत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com