

India vs Pakistan Cricket Controversy: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानातील लढत नेहमीच थरार आणि भावनांनी भरलेली असते. मात्र, गेल्या काही वर्षांत ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता खेळाडूंच्या वर्तणुकीतही दिसून येत आहे. आशिया चषक 2025 दरम्यान दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन (हॅन्डशेक) न केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता या प्रकरणावर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने एका पॉडकास्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासा केला असून यामुळे क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले.
सलमान अली आगाने दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषक 2025 मधील सामन्यांनंतर 'नो-हॅन्डशेक' धोरण स्वीकारण्यात आले होते. त्याने सांगितले की, टॉससाठी जाण्यापूर्वी मॅच रेफरीने त्याला बाजूला नेऊन या निर्णयाची कल्पना दिली होती. पत्रकार परिषदेत हस्तांदोलन झाले होते, परंतु मैदानात आणि सामन्यानंतर हात न मिळवण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्णयावर आगाने त्यावेळी सहमती दर्शवली होती, तरीही सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघाने खिलाडूवृत्ती दाखवण्यासाठी भारतीय खेळाडूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानचा (Pakistan) संघ मॅच संपल्यानंतर भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांच्या ड्रेसिंग रुमपर्यंत गेला होता, परंतु त्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला. आगाने सांगितले की, भारतीय ड्रेसिंग रुमचा दरवाजा बंद होता आणि त्यांनी हात मिळवण्यास नकार दिला. पाकिस्तानने तो सामना गमावला होता, तरीही मैत्रीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.
सलमान अली आगाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून हे चुकीचे असल्याचे म्हटले. त्याच्या मते, असे वर्तन तरुण खेळाडूंसाठी चुकीचा संदेश देते. जेव्हा खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात, तेव्हा जगभरातील लोक आणि मुले त्यांच्याकडे पाहत असतात आणि त्यांचे अनुकरण करतात. जर वरिष्ठ खेळाडूच मैदानावर अशी भूमिका घेणार असतील, तर त्याचे नकारात्मक परिणाम खालील स्तरापर्यंत पोहोचतील, अशी भीती त्याने व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तानमधील हा 'नो-हॅन्डशेक' वाद आता केवळ तांत्रिक नसून खेळाडूंच्या मानसिकतेपर्यंत पोहोचल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.