Goa Scholarship: गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी नवी शिष्‍यवृत्ती! 'पर्रीकर’ योजनेचा 50 जणांना मिळणार लाभ; जागतिक संस्थांसाठी वेगळी योजना

Goa students scholarship: अखिल भारतीय कोट्यातून निवड होणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना एकरकमी शिष्‍यवृत्ती देणारी योजना उच्च शिक्षण संचालनालयाकडून यंदापासून सुरू करण्‍यात येणार आहे.
Scholarship for Goa students
Scholarship for Goa studentsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आयआयटी, एनआयटीतील अभियांत्रिकी तसेच एम्‍स, गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) अखिल भारतीय कोट्यातून निवड होणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना एकरकमी शिष्‍यवृत्ती देणारी योजना उच्च शिक्षण संचालनालयाकडून यंदापासून सुरू करण्‍यात येणार आहे.

तसेच मनोहर पर्रीकर शिष्‍यवृत्ती योजनेअंतर्गत पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमासाठी पुढील वर्षापासून ५० विद्यार्थ्यांना शिष्‍यवृत्ती देण्‍यात येणार असल्‍याची माहिती संचालक भूषण सावईकर यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

आयआयटी, एनआयटी, एम्‍स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशनल रिसर्च (आयआयएसइआर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस), इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आयएसआय), इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च (आयसीएआर), गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा डेंटल कॉलेज, ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक सायन्स आणि तत्सम दर्जाच्या संस्थांमध्ये अखिल भारतीय कोट्यातून निवड झालेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्च शिक्षण संचालनालयाला दिले होते.

Scholarship for Goa students
Manohar Parrikar Scholarship: पर्रीकर स्कॉलर योजनेचे अर्ज संकेतस्थळावर; अधिक माहितीसाठी क्लिक करा

जागतिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी वेगळी शिष्यवृत्ती

मनोहर पर्रीकर शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर जागतिक ५०० क्रमांकांच्या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आणि परदेशात पदवीपूर्व स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही नवी योजना आखण्‍यात येणार आहे. याशिवाय मनोहर पर्रीकर शिष्‍यवृत्ती योजनेचा लाभ पुढील वर्षापासून ५० विद्यार्थ्यांना देण्‍यात येणार आहे.

Scholarship for Goa students
Manohar Parrikar: त्यांचा 'तो' कार्यकाल पूर्ण झाला असता तर गोव्याचे चित्र वेगळेच दिसले असते, वाचा विशेष लेख

शिष्‍यवृत्तीची रक्कम गुलदस्त्यात

दर्जेदार शिक्षण संस्‍थांमध्‍ये अखिल भारतीय कोट्यामधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकरकमी शिष्‍यवृत्ती देण्‍याचे उच्च शिक्षण संचालनालयाने निश्‍चित केले आहे. पण शिष्‍यवृत्तीची रक्कम नेमकी किती असेल, हे ठरविलेले नाही. पुढील काहीच दिवसांत ही नवी योजना जाहीर करण्‍यात येणार असल्‍याचे संचालक सावईकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com