

पणजी: भारताने सात वर्षांनंतर सॅफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) महिला फुटबॉल स्पर्धा सहाव्यांदा जिंकताना गतविजेत्या बांगलादेशला अंतिम लढतीत ३-१ गोलफरकाने नमविले. सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.
भारतीय महिला संघाला विजेतेपद मिळवून देताना प्यारी खाखा (४२वे मिनिट), सॅनफिडा नाँग्रुम (४६वे मिनिट) व बदली खेळाडू लिंडा कोम सेर्टो (८२वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. बांगलादेशसाठी एकमात्र गोल रितूपर्णा चकमा (४५+१ मिनिट) हिने नोंदविला.
सॅनफिडा सामन्याची मानकरी ठरली. क्रिस्पिन छेत्री यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने २०१९ नंतर प्रथमच स्पर्धेत विजेतेपद पटकावले. यापूर्वी २०१६ मध्येही भारताने अंतिम लढतीत बांगलादेशला फरकानेच ३-१ पराभूत केले होते. भारताचा शेजारील देश या स्पर्धेत २०२२ व २०२४ मध्ये विजेता ठरला होता.
प्यारी खाखा हिने १८ यार्ड बॉक्समधून बांगलादेशी बचावफळीत चकवा दिला. तिच्या डाव्या पायाचा फटका बांगलादेशची सुरोवी आफ्रिदी हिच्या आपटून उंच उडाला आणि थेट गोलनेटमध्ये घुसला. प्यारी हिचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास भारताच्या भरकटलेल्या बचावाचा लाभ उठवत रितूपर्णा चकमा हिने गतविजेत्यांना बरोबरी साधून दिली. भारतीय संघाने स्पर्धेत स्वीकारलेला हा पहिलाच गोल ठरला.
प्यारी खाखा हिच्या क्रॉस पासवर सॅनफिडा नाँग्रुम हिचे हेडिंग निर्णायक ठरले. २१ वर्षीय खेळाडूने सलग दुसऱ्या सामन्यात गोल केला. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना बांगलादेशी खेळाडूच्या ‘मिस पास’वर बदली खेळाडू सॅनफिडाने गोल केला. लिंडाचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.