वानखेडेवर पुन्हा दिसणार सचिन! IND vs SL सामन्यापूर्वी मास्टर-ब्लास्टरच्या पुतळ्याचे अनावरण

Sachin Tendulkar Statue: वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील भारत-श्रीलंका सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar

Sachin Tendulkar statue will be unveiled at Mumbai's Wankhede Stadium:

भारतीय संघाला वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील आपला सातवा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, या सामन्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी (1 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर दिग्गज सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच सचिनचा पुतळा स्टेडियममध्ये उभाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सचिन शॉट खेळत असलेला हा पुतळा असणार आहे. तसेच हा पुतळा वानखेडे स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँडमध्येच बसवण्यात आला आहे.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar : 'मी फेडररसारखे कार्लोसलाही 10-12 वर्षे...', मास्टर-ब्लास्टरकडून विम्बल्डन विजेत्याचं तोंडभरून कौतुक

अनावरण करण्यापूर्वी अंतिम तयारी मंगळवारी करण्यात येणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी अनेक मोठे सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

या सोहळ्यासाठी स्वत: सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआयचे सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक असे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

हा पुतळा अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या देखरेखेखाली बनवण्यात आला आहे.

Sachin Tendulkar
World Cup 2023: भारताने इंग्लंडला हरवताच चाहत्यांना आठवला 'लगान', भन्नाट मीम्स व्हायरल

सचिन तेंडुलकरची कारकिर्द

सचिन तेंडुलकर हा जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. 24 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक मोठे विक्रम केले आहे, त्यातीन अनेक विक्रम अजूनही त्याच्या नावावर आहेत. त्याने 1989 ते 2013 दरम्यान भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले.

सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक 664 सामने खेळताना 48.52 च्या सरासरीने 34357 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 100 शतकांचा समावेश आहे. यातील 463 सामने त्याने वनडे क्रिकेटमध्ये खेळताना 44.83 च्या सरासरीने 49 शतकांसह सर्वाधिक 18426 धावा केल्या आहेत.

तसेच तो 200 कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू असून त्याने कसोटीत 53.78 च्या सरासरीने 51 शतकांसह 15921 धावा केल्या आहे. याशिवाय सचिनने वनडेत 154 विकेट्स घेतल्या आहेत, तसचे कसोटीत 46 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकमेव आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळतानाही 1 विकेट घेतली आहे.

सचिनने 2008 ते 2013 दरम्यान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने आयपीएलमध्ये 78 सामने खेळताना 2334 धावा केल्या आहेत. यामध्येही त्याने 1 शतक आणि 13 अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com