Sachin Tendulkar praises Yashasvi Jaiswal after scoring Double Century during India vs England, 2nd Test Match:
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात कसोटी मालिका सुरू असून दुसरा सामना शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणमला खेळवला जात आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वालने द्विशतकी खेळी केली आहे. याबद्दल त्याचे सध्या कौतुक होत आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही विशेष शब्दात जयस्वालचे कौतुक केले आहे.
यशस्वी जयस्वाल या सामन्यात पहिल्या दिवशी 179 धावांवर नाबाद होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच 102 व्या षटकात शोएब बशीरविरुद्ध षटकार आणि चौकार ठोकत द्विशतक पूर्ण केले.
या डावात जयस्वालने 209 धावांची खेळी केली. ही खेळी त्याने 290 चेंडूत 19 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने केली. हे जयस्वालचे कारकिर्दीतील पहिले द्विशतक आहे. त्याने कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्यावर्षी पहिले शतक केले होते.
सचिनने पहिल्या दिवशी जयस्वालच्या शतकानंतर केलेल्या ट्वीटमध्ये 'यशस्वी भव:', असे लिहित जयस्वालचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच द्विशतकानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की 'मस्त यशस्वी. शानदार कामगिरी.'
जयस्वाल कसोटीत द्विशतक करणारा भारताचा तिसऱ्या क्रमांकाच सर्वात युवा फलंदाज देखील आहे. जयस्वालने 22 वर्षे 37 दिवस इतके वय असताना हे द्विशतक झळकावले. त्याच्या आधी विनोद कांबळीने 21 व्या वर्षात कसोटीमध्ये दोन द्विशतके केली होती, तर सुनील गावसकरांनी 21 व्या वर्षी पहिले कसोटी द्विशतक केले होते.
दरम्यान, जयस्वालने भारताच्या पहिल्या डावात सर्वोच्च धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त भारताकडून कोणत्याच फलंदाजाला 40 धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून शुभमन गिल आणि रजत पाटीदार यांनीत 30 हून अधिक धावा केल्या. गिलने 34 आणि रजतने 32 धावा केल्या.
इंग्लंडकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच टॉम हर्टलीने 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.