IND vs ENG: जयस्वालने डबल धमाका! 209 धावा करत 22 व्या वर्षीच दिग्गजांमध्ये मिळवलं स्थान

Yashasvi Jaiswal Double Century: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वालने 209 धावांची खेळी करत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalX/BCCI
Published on
Updated on

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, Yashasvi Jaiswal Double Century Record:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरू झाला. या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतकी खेळी केली. यासह त्याने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.

या सामन्यात भारताचा पहिला डाव 112 षटकात 396 धावांवर संपला. या डावात भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 209 धावांची खेळी केली. त्याने 290 चेंडूत ही खेळी करताना 19 चौकार आणि 7 षटकार मारले.

Yashasvi Jaiswal
IND vs ENG: ...सिक्स, फोर अन् जयस्वालचं खणखणीत द्विशतक, टीममेट्सकडूनही खास कौतुक, पाहा Video

दरम्यान, हे जयस्वालने पहिलेच द्विशतक आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील 10 व्या कसोटी डावात खेळताना हे द्विशतक साकारले. त्यामुळे सर्वात कमी डावात कसोटीमध्ये द्विशतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर करुण नायर आहे. त्याने तिसऱ्याच कसोटी डावात द्विशतक केले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर विनोद कांबळी आहे. त्याने चौथ्याच डावात पहिले कसोटी द्विशतक झळकावले होते.

तिसऱ्या क्रमांकावर सुनील गावसकर आणि मयंक अगरवाल हे दोघे संयुक्तरित्या आहेत. या दोघांनीही प्रत्येकी 8 व्या डावात पहिले द्विशतक ठोकले होते. याशिवाय चौथ्या क्रमांकावर असलेल्या चेतेश्वर पुजाराने 9 व्या डावात खेळताना पहिले कसोटी शतक केले होते.

22 व्या वर्षीत मोठी कामगिरी

दरम्यान, हे द्विशतक झळकावले, तेव्हा म्हणजेच शनिवारी जयस्वालचे वय 22 वर्षे 37 दिवस होते. त्यामुळे तो कसोटी कारकिर्दीत सर्वात कमी वयात पहिले द्विशतक करणारा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू ठरला आहे.

कसोटी कारकिर्दीत सर्वात कमी वयात पहिले द्विशतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विनोद कांबळी आहे. कांबळीने 21 वर्षे 35 दिवस वय असताना मुंबईत इंग्लंडविरुद्ध 1993 साली खेळताना 224 धावांची खेळी केली होती. हे त्याचे पहिले द्विशतक होते.

तसेच या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सुनील गावसकर असून त्यांनी 21 वर्षे 283 दिवस इतके वय असताना कसोटी क्रिकेटमधील त्यांचे पहिले द्विशतक केले होते. त्यांनी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 1971 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 220 धावांची खेळी केली होती.

Yashasvi Jaiswal
IND vs ENG: अँडरसनचं पदार्पण झालं, तेव्हा इंग्लंडच्या प्लेइंग-11 मधील 'या' दोघांचा जन्मही झाला नव्हता

तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 1993 सालीच विनोद कांबळीने 21 वर्षे 55 दिवस वय असताना झिम्बाब्वेविरुद्ध दिल्लीत देखील द्विशतक केले होते. हे त्याचे कसोटीतील दुसरे द्विशतक होते. त्यामुळे भारतासाठी सर्वात कमी वयात कसोटीत द्विशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या दोन्ही क्रमांकावर विनोद कांबळीच आहे.

भारतासाठी कसोटीत सर्वात कमी वयात द्विशतक करणारे फलंदाज

  • 21 वर्षे 35 दिवस - विनोद कांबळी (विरुद्ध इंग्लंड, मुंबई, 1993)

  • 21 वर्षे 55 दिवस - विनोद कांबळी (विरुद्ध झिम्बाब्वे, दिल्ली, 1993)

  • 21 वर्षे 283 दिवस - सुनील गावसकर (विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, 1971)

  • 22 वर्षे 37 दिवस - यशस्वी जयस्वाल (विरुद्ध इंग्लंड, विशाखापट्टणम, 2024)

डावखुऱ्या दिग्गजांमध्येही जयस्वालचे नाव

भारताकडून कसोटीत द्विशतक करणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांमध्येही जयस्वालचे नाव सामील झाले आहे. जयस्वालपूर्वी सौरव गांगुली, विनोद कांबळी आणि गौतम गंभीर या डावखुऱ्या फलंदाजांनी कसोटीत द्विशतक केले आहे. कांबळीने दोनदा कसोटीत द्विशतके केली आहेत. तसेच गांगुली आणि गंभीर यांनी प्रत्येकी एकदा कसोटीत द्विशतक केले आहे.

भारतासाठी कसोटीत द्विशतक करणारे डावखुरे फलंदाज

  • 239 धावा - सौरव गांगुली (विरुद्ध पाकिस्तान, बंगळुरू, २००७)

  • 227 धावा - विनोद कांबळी (विरुद्ध झिम्बाब्वे, दिल्ली, १९९३)

  • 224 धावा - विनोद कांबळी (विरुद्ध इंग्लंड, मुंबई, १९९३)

  • 206 धावा - गौतम गंभीर (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली, २००६)

  • 209 धावा - यशस्वी जयस्वाल (विरुद्ध इंग्लंड, विशाखापट्टण, २०२४)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com