Sachin Tendulkar: सुनेच्या बॉलिंगवर क्रिकेटचा देव OUT, कॅच झेलताच लेकीनं केला जल्लोष; विमानातच रंगला सामना Watch Video

Sachin Tendulkar Flight Cricket Video: विमानाने प्रवास करत असताना सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासोबत चक्क विमानाच्या आतच हलक्या-फुलक्या अंदाजात क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
Sachin Tendulkar Flight Cricket Video
Sachin Tendulkar Flight CricketDainik Gomantak
Published on
Updated on

Sachin Tendulkar Playing Cricket Inside Airplane: क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली असली, तरी क्रिकेटबद्दलची त्याची आवड आणि निष्ठा आजही तशीच जिवंत आहे. याचाच प्रत्यय नुकताच सोशल मीडियावर समोर आलेल्या एका मजेशीर व्हिडिओमधून आला. विमानाने प्रवास करत असताना सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासोबत चक्क विमानाच्या आतच हलक्या-फुलक्या अंदाजात क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

या अनोख्या सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामध्ये त्याची लेक सारा तेंडुलकर आणि सून सानिया चंडोक यांनी सचिनला आउट केल्याचे पाहायला मिळत आहे. कुटुंबासोबतचे हे आनंदाचे आणि मजेशीर क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून चाहत्यांकडून यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Sachin Tendulkar Flight Cricket Video
Viral Video: चोरी केली, पण नशिबानं खेळ केला! कारचालकानं भररस्त्यात चोराला ठेचलं; नेटकरी म्हणाले,"कर्माचा स्पीड पाहून 5जी इंटरनेटही लाजेल!"

हा अत्यंत रंजक व्हिडिओ स्वतः सचिन तेंडुलकरने त्याच्या 'X' हँडलवरुन शेअर केला. व्हिडिओमध्ये दिसते की, विमानातील दोन सीट्सच्या मधल्या पॅसेजमध्ये सचिन बॅटिंग पोझिशनमध्ये उभा आहे. कुटुंबातील सदस्यांनी एका लहान सॉफ्ट बॉलचा वापर करुन हा खेळ सुरु केला. हा व्हिडिओ पोस्ट करताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उंची (Altitude) कोणतीही असो, वृत्ती (Attitude) बदलली नाही पाहिजे.' खेळादरम्यान जेव्हा सारा तेंडुलकर आपल्या वडिलांना आउट देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा सचिन गमतीने म्हणतो, "तू मला आउट करु शकणार नाहीस. जर मी आडव्या बॅटने खेळलो, तरच तुम्हाला आउट करण्याची थोडीफार संधी मिळेल."

Sachin Tendulkar Flight Cricket Video
Viral Video: महिलेची बॅग पळवणे चोराला पडले भारी, कार चालकाने रस्त्यावरच केला 'गेम' ओव्हर! पाहा व्हायरल व्हिडिओ

मात्र, त्यानंतर अवघ्या एक-दोन चेंडूंमध्येच सून सानियाने टाकलेल्या चेंडूवर सचिनने हवेत शॉट मारला आणि साराने त्याचा कॅच घेतला. अशा प्रकारे सचिन आउट झाल्यावर संपूर्ण कुटुंबाने हसत-खळत या सुट्ट्यांच्या क्षणांचा आनंद घेतला.

सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) हा साधेपणा आणि क्रिकेटवरील प्रेम पाहून सोशल मीडियावरील नेटीझन्सनी यावर वेगवेगळ्या आणि भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, 'सचिन हा भारतातील सर्वात नम्र आणि डाऊन टू अर्थ सुपरस्टार आहे.' तर दुसऱ्या एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, 'तुम्ही क्रिकेटचे जगातील सर्वात महान सदिच्छा दूत आहात. क्रिकेटप्रती तुमचे समर्पण तुमच्या आयुष्यापेक्षाही मोठे आहे.'

Sachin Tendulkar Flight Cricket Video
Viral Video: जवळ गेला, पायाला स्पर्श केला अन्...; मनालीत टवाळखोरांकडून परदेशी तरुणीची छेडछाड; संतापजनक प्रकार CCTV मध्ये कैद

एका जुन्या चाहत्याने सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची आठवण काढत लिहिले की, 'सर, मी तुमचा हाच ॲटिट्यूड पहिल्यांदा तेव्हा पाहिला होता जेव्हा तुम्ही अवघ्या 16 वर्षांचे होतात. सियालकोट कसोटीत वकार युनूसचा चेंडू लागून नाक फुटले होते आणि रक्‍त वाहत होते, तरीही तुम्ही "मै खेलेगा" म्हणत खेळत राहिलात आणि भारताला (India) पराभवापासून वाचवले. आम्ही तुमचे कायमचे चाहते आहोत.' निवृत्तीनंतरही चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सचिनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावपर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com