Amir Hussain: जिद्दीला सलाम! दोन्ही हात नसताना क्रिकेट खेळणाऱ्या अमीरचा सचिन तेंडुलकरही बनला फॅन, अदानींकडूनही मदत

Amir Hussain Lone: जम्मू-काश्मीर पॅरा संघाचा कर्णधार असलेल्या अमीरने अपघातात दोन्ही हात गमावले होते, पण तरी त्याने जिद्दीने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली.
Amir Hussain Lone
Amir Hussain LoneANI
Published on
Updated on

Sachin Tendulkar, Gautam Adani praises Jammu and Kashmir para cricketer Amir Hussain Lone:

जिद्द असेल, तर अनेकदा अशक्य गोष्टीही शक्य करता येतात, असे म्हटले जाते. याच गोष्टीचा प्रत्येय जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू अमीर हुसेन लोनकडे पाहून येतो. त्याने दोन्ही हात एका अपघातात गमावले असतानाही जपलेली क्रिकेटची आवड पाहून अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून बिझनेसमन गौतम अदानींपर्यंत अनेकांना प्रभावित केले आहे.

34 वर्षीय अमीर जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. तो पायाने गोलंदाजी करतो, तर मान आणि खांद्याच्या मध्ये बॅट धरून फलंदाजी करतो.

अनंतनागमधील असलेल्या अमीरचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याचे कौतुक केले होते, तसेच गौतम आदानी यांनी त्याला मदतही देऊ केली आहे. याबद्दल अमीरनेही आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, तो प्रकाशझोतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आशिष नेहराने त्याला 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील मुंबईत झालेल्या उपांत्य सामन्यासाठी आमंत्रणही दिले होते.

Amir Hussain Lone
Sachin Tendulkar: कोकण दौऱ्याच्या आठवणीना उजाळा देत मास्टर-ब्लास्टरची भारतीय किनारपट्टी पर्यटनासाठी बॅटिंग

अमीरने वयाच्या सातव्या वर्षी १९९७ साली त्याच्या कुटुंबाच्या सॉमिलमध्ये झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर गावातील आर्मी युनिट आणि कुटंबाच्या प्रयत्नांमुळे त्याला त्वरित उपचार मिळाले होते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्याने सांगितले की 'जर जवानांनी मला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत केली नसती, तर कदाचीत मी जिवंत राहिलो नसतो. माझ्यावर जम्मू-काश्मीरबाहेर विशेष उपचार करण्यात आले. माझ्या उपचारांसाठी वडिलांना सॉमिलही विकावी लागली.'

दरम्यान, अमीरला त्याच्या आजीने पुन्हा शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच २०१३ साली एका शिक्षकांनी त्याच्यातील क्षमता ओळखली आणि त्याला प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आणले. तेव्हापासून त्याने क्रिकेटमध्ये प्रगती केली आहे.

त्याच्या या यशाची दखल खुद्द सचिननेही घेतली असून त्याने ट्वीट केले की 'अमीरने अशक्यही शक्य केले आहे. मी त्याला पाहून भारावलो आहे. त्याचे खेळासाठी किती प्रेम आणि जिद्द आहे, हे यातून दिसते. आशा आहे की मी त्याला एक दिवस भेटेल आणि त्याच्या नावाची जर्सी घेईल. खेळ खेळण्याची इच्छा असणाऱ्या कोट्यवधींसाठी तो प्रेरणा आहे.'

Amir Hussain Lone
Sachin Tendulkar: '...त्यामुळे मी प्रभावित झालो', शतक करणाऱ्या केएल राहुलची सचिनने थोपटली पाठ

तसेच गौतम अदानी यांनी ट्वीट केले की 'अमीरची भावूक करणारी अद्भूत कहाणी आहे. आम्ही तुझ्या हिंमतीला, खेळप्रती असलेल्या निष्ठेला आणि कठीण परिस्थितीतही हार न मानण्याच्या इच्छाशक्तीला प्रणाम करतो. अदानी फाऊंडेशन तुझ्याशी लवकरच संपर्क करतील आणि या तुझ्या शानदार प्रवासात शक्य ती मदत केली जाईल. तुझा संघर्ष आमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे.'

या ट्वीटनंतर अमीरने एनआयकडे आनंद व्यक्त करताना म्हटले की 'मी अदानी सरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि त्यासाठी मला लायक समजल्याबद्दल आभार मानतो. मी ट्वीट पाहिले आणि मी खूप आनंदी आहे. आशा आहे की मला माझ्या प्रवासात याची मदत मिळेल. सचिन सरांनीही काल ट्वीट केले आणि आज आदानी सरांनी, मी खूप आनंदी आहे. मला आशा आहे आम्हाला मदत मिळेल.'

तो पुढे म्हणाला, 'मी विचार नव्हता केला की दिग्गज लोक माझ्याबद्दल ट्वीट करतील. मला वाटतं माझ्या संघर्षाचे फळ मला मिळत आहे. मी केवळ त्यांचे आभार मानतो.' तसेच त्याने असेही म्हटले की हे सर्व त्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखे आहे.

अमीरची पत्नी शोकजी यांनीही सचिन आणि अदानी यांनी अमीरचे कौतुक केल्याबद्दल आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com