Sachin Tendulkar Video: मास्टर ब्लास्टर घेतोय या कलेचं ट्रेनिंग, रिव्हर्स स्विंगशीही केली तुलना

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या थायलंडमध्ये आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 9 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण त्यांच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. अलीकडे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये त्याची बॅटिंग चर्चेत होती. संघाचे नेतृत्व करताना त्याने भारताला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिले. सचिन सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतो. आजकाल मास्टर ब्लास्टर थायलंडमध्ये आहे. तो नवीन कला शिकत आहे. यादरम्यान तो बोट चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

थायलंडमध्ये सुट्टी घालवणारा सचिन तेंडुलकर बोटिंगच्या सहलीला जाण्यापूर्वी बोटिंगची कला शिकत आहे.  याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती त्यांना नौकानयन करताना रडर कसे चालवायचे ते शिकवत आहे. रडर हातात घेऊन सचिन म्हणतो की हे रिव्हर्स स्विंगसारखे आहे. सचिन पुढे व्हिडिओमध्ये (Video) म्हणतो की, मी हे पहिल्यांदाच करत आहे. 

Sachin Tendulkar
Suryakumar Yadav: 'वडिलांनी मेसेज केला, तेव्हा...' उपकर्णधारपदावर सूर्यकुमारची प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. सचिनने सर्वाधिक 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 

यादरम्यान त्याने कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतके झळकावली. क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये 100 शतके झळकावणारा सचिन हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. त्याने कसोटीत सर्वाधिक 15921 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. त्याच्या या विक्रमाच्या आसपास सध्या जगात एकही क्रिकेटपटू नाही. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com