Sachin Tendulkar: रविवारी (15 जानेवारी) संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही एकमेकांना तिळगुळ देऊन या सणाचा गोडवा वाढवला जातो. या सणानिमित्त अनेक घरात तिळाचे लाडूही बनतात. असेच तिळगुळाचे लाडू खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही बनवले आहेत.
सचिनने रविवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने कॅप्शन दिले आहे की 'तिळगुळ बनवण्याचा माझा पहिला प्रयत्न!' तसेच हा व्हिडिओ त्याने मराठीत बनवला असून त्याने सर्वांना व्हिडिओच्या सुरुवातीला संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर त्याने सांगितले की घरात कोणालाही तो तिळगुळाचे लाडू बनवत आहे, हे माहित नाही. त्यामुळे सर्वांसाठी हे सरप्राईज असणार आहे. तसेच नंतर त्याने तिळगुळाच्या लाडूची रेसिपी देखील सांगितली. तसेच त्याने असेही सांगितले की घरात कुटुंबातील सर्वचजण आहे. त्यांना तो हे लाडू देणार आहे.
सचिनच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक चाहत्यांनी त्यालाही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सचिन सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो असे अनेक फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असतो. त्याने काहीदिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये चूलीवरील जेवणाचा अस्वाद घेतला होता. त्याचा व्हिडिओही त्याने शेअर केला होता. त्याचा हा व्हिडिओही बराच व्हायरल झाला होता.
सचिन जगातील महान फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानेही त्याचा गौरव करण्यात आला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.
सचिनने त्याच्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 51 शतकांसह 15921 धावा केल्या आहेत. त्याने 463 वनडे सामने देखील खेळले असून यामध्ये त्याने 18426 धावा केल्या आहेत. वनडेत त्याने 49 शतके केली आहेत.
सचिनने त्याच्या कारकिर्दीत 1 आंतरराष्ट्रीय टी20 सामना देखील खेळला आहे. यामध्ये त्याने 10 धावा केल्या आहेत. तसेच त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 201 विकेट्सही घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.