Brittany Griner: अमेरिकन बास्केटबॉल महिला खेळाडूला रशियात 9 वर्षांचा तुरुंगवास

Brittany Griner Arrested: 31 वर्षीय ग्रिनरला हँडकफ घालून कोर्टरुममधून घेऊन जात असताना, "मला माझ्या कुटुंबावर प्रेम आहे" असे म्हणताना ऐकू आले.
Brittany Griner
Brittany GrinerDainik Gomantak

Brittany Griner Arrested: रशियन न्यायालयाने गुरुवारी अमेरिकन बास्केटबॉल स्टार ब्रिटनी ग्रिनरला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 31 वर्षीय ग्रिनरला हँडकफ घालून कोर्टरुममधून घेऊन जात असताना, "मला माझ्या कुटुंबावर प्रेम आहे" असे म्हणताना ऐकू आले.

दरम्यान, ग्रिनरची वकील मारिया ब्लागोव्होलिना म्हणाल्या की, माझी क्लायंट "खूप अस्वस्थ आणि खूप तणावग्रस्त" होती. ती क्वचितच बोलू शकते. तिच्यासाठी हा कठीण काळ आहे. जेव्हा आम्ही ब्रिटनीला मंगळवारी पाहिले तेव्हा आम्ही तिला 'गुरुवारी भेटू' असे सांगितले. यावर ती म्हणाली, 'कयामतच्या दिवशी भेटू', त्यामुळे असे दिसते की ती बरोबर होती."

Brittany Griner
Azerbaijan ने आर्मेनियावर केला हल्ला, रशिया म्हणाला, 'युद्धविरामाचे केले उल्लंघन'

तसेच सुमारे 13 लाख रुपयांचा दंड ठोठावला

रशियन न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने (Court) आरोपीला प्रतिबंधित औषध बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. रशियन न्यायाधीश अन्ना सोतनिकोवा यांनी 31 वर्षीय ग्रिनरला मॉस्कोच्या खिमकी शहरात नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि दहा लाख रुबल (13 lakhs around Rs) दंडही ठोठावला.

Brittany Griner
रशिया युक्रेन युद्धात युक्रेनच्या 10 हजार सैनिकांचा मृत्यू

त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'ही शिक्षा एकतर्फी आणि अस्वीकार्य आहे.' त्याचबरोबर यूएस स्टेट सेक्रेटरी अँटोनी ब्लिंकन म्हणाले, "रशियासाररखे (Russia) देश निष्पाप लोकांना चुकीच्या पध्दतीने ताब्यात घेतात."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com