Attack
AttackDainik Gomantak

Azerbaijan ने आर्मेनियावर केला हल्ला, रशिया म्हणाला, 'युद्धविरामाचे केले उल्लंघन'

Azerbaijan Vs Armenia: अझरबैजानने तुर्कीकडून मिळालेल्या शस्त्रांच्या आधारे आर्मेनियावर हल्ला केला.
Published on

Azerbaijan Attacked Armenia: चीन आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावादरम्यानच अझरबैजान आणि आर्मेनिया या मध्य आशियाई देशांमध्येही तणाव वाढला. अझरबैजानने तुर्कीकडून मिळालेल्या शस्त्रांच्या आधारे आर्मेनियावर हल्ला केला. नागरनो-काराबाखचे अनेक भाग अझरबैजानने ताब्यात घेतले.

दरम्यान, दोन्ही देशांमधील युद्धविरामासाठी मध्यस्थी करणाऱ्या रशियाने नागार्नो-काराबाख या वादग्रस्त भागात अझरबैजानने करार मोडल्याचा आरोप केला आहे. तत्पूर्वी, अझरबैजानने (Azerbaijan) आरोप केला होता की, आर्मेनियामधील (Armenia) बेकायदेशीर सशस्त्र गटांनी आपले तीन सैनिक मारले आहेत.

Attack
अझरबैजान बरोबरच्या युद्धात आर्मेनिया पुन्हा कमकुवत, रशियाकडे मागितली मदत

यापूर्वी, 2020 मध्ये आर्मेनियामध्ये सुमारे 6 आठवडे चाललेल्या भीषण युद्धात 6500 हून अधिक लोक मारले गेले होते. यानंतर रशियन हस्तक्षेपामुळे दोघांमध्ये युद्धविराम झाला. गुरुवारच्या हल्ल्यात, रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अझरबैजानच्या सशस्त्र सैन्याने युद्धविरामाचे उल्लंघन केले.

Attack
'तैवानजवळील लष्करी सराव तात्काळ थांबवा', पेलोसींच्या भेटीनंतर जपानचा संताप

तुर्की-पाकिस्तान अझरबैजानला मदत करत आहे

आर्मेनिया आणि अझरबैजानच्या प्रतिनिधींसोबत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे रशियाने (Russia) म्हटले आहे. अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये दीर्घकाळापासून शत्रुत्व आहे. अझरबैजानला तुर्की आणि पाकिस्तानी सैन्याने भडकावले आहे. दोन्ही देशांचे सैन्य अझरबैजानला सातत्याने मदत करत आहेत. तुर्की ड्रोन आर्मेनियाविरूद्ध प्रभावी सिद्ध होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com