सनरायझर्स हैदराबाद (SRH VS KKR) विरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 28 चेंडूत 49 धावा केल्या. रसेलने 3 चौकारासंह 4 षटकार लगावले. केकेआरला केवळ रसेलच्या खेळीच्या जोरावर 177 धावा करता आल्या. धमाकेदार स्टाईलमध्ये फलंदाजी करत रसेलने हैदाराबादचा धुव्वा उडवला. (Russell has become only player in history of IPL to have scored more than 250 runs and more than 10 wickets in 4 IPL seasons)
दरम्यान, रसेलचे (Andre Russell) अर्धशतक केवळ 1 धावेने हुकले, पण त्याने आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली जी सर्वांना आश्चर्यचकित करेल. आयपीएलच्या इतिहासातील 4 आयपीएल हंगामात 250 हून अधिक धावा आणि 10 हून अधिक बळी घेणारा रसेल हा एकमेव खेळाडू ठरला आहे. रसेलपूर्वी, जॅक कॅलिसने (Jacques Kallis) आयपीएलच्या 3 हंगामात 250 हून अधिक धावा आणि 10 हून अधिक विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच, रसेल आता आघाडीवर आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. जॅक कॅलिस व्यतिरिक्त, पोलार्ड आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आयपीएलच्या 2 हंगामात अशी कामगिरी करण्यात यश मिळवले आहे, तर शेन वॉटसनने देखील 2 हंगामात 250 हून अधिक धावा आणि 10 हून अधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.
दुसरीकडे, आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये रसेलने आतापर्यंत 330 धावा आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत. या सीझन व्यतिरिक्त, रसेल 2019 च्या आयपीएलमध्ये 510 धावा आणि 11 विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता. त्याच वेळी, 2018 मध्ये त्याने 316 धावांसह 13 विकेट घेतल्या. त्याचवेळी 2015 च्या मोसमात रसेलने 326 धावा आणि 14 विकेट घेतल्या होत्या.
या विक्रमाशिवाय, रसेल आयपीएलमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. रसेलने 1129 चेंडूत 2000 आयपीएल धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर केकेआरमधील 2000 धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. गौतम गंभीर (3345), रॉबिन उथप्पा (2649) आणि युसूफ पठाण (2061) यांनी केकेआरसाठी आयपीएलमध्ये 2000 हून अधिक धावा केल्या आहेत.
याशिवाय, सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रसेलच्या झंझावाती खेळीमुळे आणि सॅम बिलिंग्जसोबत केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे उमरान मलिककडून आलेल्या धक्क्यांवर मात करत या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 177 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.