IPL 2022: अंबाती रायुडूचा यू टर्न, 2 तासांत निवृत्तीच्या निर्णयानंतर डिलीट केले ट्विट

चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायुडूने या आयपीएल हंगामानंतर या स्पर्धेतून निवृत्ती घेणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते.
CSK
CSKDainik Gomantak
Published on
Updated on

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज अंबाती रायुडूने या आयपीएल हंगामानंतर या स्पर्धेतून निवृत्ती घेणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र अवघ्या दोन तासांतच त्याने निवृत्तीबाबत केलेले ट्विट डिलीट केले. आता रायुडूने निवृत्तीचे ट्विट का केले आणि नंतर डिलीट का केले असा प्रश्न उपस्थित होतो आहे. (Ambati Rayudu U turn on the decision to retire in 2 hours tweeted Delete)

CSK
IPL 2022: कोलकाताचा IPL प्रवास संपणार? तर विजयाने हैदराबादच्या मार्गात अडचणी

चेन्नई सुपर किंग्जमध्ये सर्व काही ठीक आहे का? रायुडूने निवृत्तीबद्दल काय ट्विट केले होते आणि जे नंतर डिलीट करण्यात आले. रायडूने लिहिले की, “मी आनंदाने जाहीर करतो की हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असणार आहे. मी गेल्या 13 वर्षांत दोन महान संघांसोबत खेळलो आहे. या अद्भुत प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे आभार मानतो."

CSK
CSKDainik Gomantak

रायुडू 2018 पासून चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू होता. यादरम्यान, त्याने 2018 आणि 2021 मध्ये CSK सोबत विजेतेपदही जिंकले आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, रायुडूच्या निवृत्तीच्या ट्विटनंतर चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने त्याच्याशी संवाद देखील साधला. यानंतर रायडूने त्याचे ट्विट डिलीट केले. रायुडूने निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. 2019 मध्ये, विश्वचषक संघात निवड न झाल्यानंतरही त्याने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण, नंतर यू-टर्न घेतला आणि देशांतर्गत आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना, रायुडूने 2013, 2015 आणि 2017 मध्ये मुंबईसह आयपीएल खिताब देखील जिंकले आणि त्यानंतर 2018 आणि 2021 मध्ये त्याच्या सध्याचा संघ सुपर किंग्ससह आयपीएल ट्रॉफी देखील जिंकली. आयसीएलशी संलग्न असल्यामुळे रायुडूला पहिली दोन वर्षे खेळता आले नाही. तसेच रायुडूने आतापर्यंत 187 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या 4187 धावा आणि 22 अर्धशतक झाली आहेत. याशिवाय त्याने शतकही ठोकले. रायुडू आयपीएल खेळत असला तरी पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो क्वचितच चाहत्यांना खेळताना दिसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com