Goa Gram Sabha : राज्यातील ग्रामसभा तापल्‍या; अवेडे येथे उपसरपंचाच्या पतीला मारहाण

मार्ना-शिवोलीत चित्रीकरणाच्या मुद्यावरून वादंग
Goa Gram Sabha
Goa Gram SabhaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Gram Sabha : अवेडे ग्रामसभेत आज उपसरपंचांच्या पतीला मारहाण झाल्‍याने बराच वादंग झाला. प्रभाग क्रमांक पाचमध्ये सरपंचांनी येऊ नये, असा मुद्दा उपस्‍थित केला गेल्‍याने निर्माण झालेल्‍या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. तर मार्ना-शिवोली ग्रामसभेत आरजी कार्यकर्त्यांनी व्‍हिडिओ रेकॉर्डिंग (चित्रीकरण) करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

अवेडे येथे आज ग्रामसभा झाली. यावेळी एका ग्रामस्थाने प्रभाग क्रमांक 5 मध्‍ये रस्ते ठीक नसल्याने आपली गाडी रस्त्यावरील खड्यात अडकून पडल्‍याचे सांगितले व सदर प्रश्‍‍नी सरपंचांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

प्रभाग 5च्‍या पंच तथा उपसरपंच शिल्पा प्रभुदेसाई यांच्या अनुपस्थित त्यांचे पती गजानन प्रभुदेसाई यांनी सरपंचांनी प्रभाग पाचमध्ये लक्ष घालू नये; त्यांनी आपल्याच प्रभागात पाहावे, असे सांगितले असता साविओ नामक ग्रामस्थाने विधानावर हरकत घेतली.

Goa Gram Sabha
Calangute Accident : कळंगुटमधील भीषण अपघातात 18 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सरपंच हे गावचे प्रमुख आहेत. त्‍यांना रोखता येणार नाही, असे त्‍यांनी म्‍हणताच प्रभुदेसाई व साविओ यांच्यात जबरदस्त शाब्दिक चकमक झाली. या वादाचे मारहाणीत रूपांतर झाले.

  • यापूर्वीही प्रभुदेसाई यांनी प्रसाद नामक ग्रामस्थावर भर ग्रामसभेत खुर्ची उचलून मारण्याचा प्रयत्न केला होता, असा लोकांनी यावेळी दावा केला.

  • उपसरपंच शिल्पा प्रभुदेसाई या पंचायतीच्या अनेक बैठकांमध्‍ये अनुपस्थित राहिल्या आहेत. आजही त्‍या ग्रामसभेत नव्‍हत्‍या.

  • त्‍यामुळेच काही नागरिकांनी प्रभागातील समस्या सरपंचांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला उपसरपंचांचे पती प्रभुदेसाई यांनी हरकत घेतल्याने आजची परिस्थिती उद्भवली, असे प्रत्‍यक्षदर्शीने सांगितले.

Goa Gram Sabha
Goa Congress : वनमंत्री, सरकार लोकांचा आवाज दाबण्यासाठी ‘हक्कभंगाचा’ वापर करत आहे : अमित पाटकर

पोलिसांचा हस्‍तक्षेप, परिस्‍थिती नियंत्रणात

मार्ना-शिवोली ग्रामसभा आज बेकायदा बांधकामांवरून बरीच गाजली. ‘आरजी’चे स्थानिक नेते उद्देश पांगम व अन्य एकाने सभेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता, ग्रामस्थ मयूर तोरस्कर तसेच सरपंच अभय शिरोडकर यांनी त्यांना रोखले.

परवानगीशिवाय ग्रामसभेचे चित्रीकरण करण्यास मनाई केली; परंतु आरजी कार्यकर्त्यांनी आपण त्‍यासाठी अधिकृत अर्ज केल्‍याचे सांगितले. बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांनी सभेत हस्तक्षेप करीत परिस्‍थितीवर नियंत्रण मिळवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com