न्यूझीलंडकडून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रॉस टेलरने निवृत्ती जाहीर केली आहे. एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. याआधी न्यूझीलंडला (New Zealand) घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे आणि ही मालिका टेलरची शेवटची कसोटी मालिका असेल. टेलरने (Ross Taylor) म्हटले, कोविड-19 प्रोटोकॉल आणि क्वारंटाइन, या दोन गोष्टींमुळे क्रिकेटला अलविदा करण्यास मदत झाली.
क्रिकबझने आपल्या अहवालात टेलरचा हवाला देत म्हटले आहे की, "गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या मनात एक खूप मोठी गोष्ट घरुन करुन बसली आहे. ऑस्ट्रेलियन मालिका अगदी जवळ आली असून नंतर क्वारंटाईनमध्ये राहण्यासाठी परत येत आहे. कदाचित एक संघ ऑस्ट्रेलियाला (Australia) जाईल आणि कसोटी संघ न्यूझीलंडमध्ये असेल. त्यामुळे मला निर्णय घेणे सोपे झाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) खेळूण खूप छान वाटले असते परंतु ऑस्ट्रेलिया असा आहे जिथे मला खेळायला आवडते… मग एकदिवसीय क्रिकेट खेळून माझ्या कारकिर्दीचा शेवट करणे खूप छान होईल, जो माझे आवडता क्रिकेट फॉरमॅट आहे.”
आपल्या अटी पूर्ण करणे विलक्षण- टेलर
टेलर म्हणाला, स्वतःच्या अटींवर ठाम असताना करिअरला अलविदा म्हणणे आश्चर्यकारक आहे. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हीच योग्य वेळ आहे. तसेच माझ्यात थोडे क्रिकेट शिल्लक आहे. जरी मी खेळलो असतो आणि नंतर माझी निवृत्ती जाहीर केली असती, परंतु या टप्प्यावर तुम्ही तसे करु शकत नाही. मी बराच वेळ ह्याचा विचार करत होतो. मी काही आठवड्यांत घेतलेला हा निर्णय नाही. आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असणे आणि आपल्या स्वतःच्या अटींवर ठाम राहणे मला आवडते. ही फेअरवेल टूर चांगली जात नाही हे पण मला माहित आहे, परंतु ती करावी लागणार आहे. यामुळे माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना मला शेवटच्या वेळी खेळताना पाहण्याची संधी मिळेल.”
कारकिर्द
आपल्या कारकिर्दीबाबत टेलर म्हणाला, पहिली कसोटी मालिका खेळल्यानंतर मला वाटले की, माझे काम पूर्ण झाले आहे. मला नेहमी वाटायचे की मी एकदिवसीय क्रिकेट खेळू शकतो. मला माहीत नव्हते की मी कसोटी क्रिकेट खेळू शकेन की नाही. पण मी खूप मेहनत केली आणि मला वाटते की ही माझी सर्वात मोठी उपलब्धी असवी. माझी सरासरी ३० च्या आसपास असू शकते परंतु मी संघासाठी माझा खेळ बदलला. मला वाटत नाही की बरेच लोक या दिशेने आपला खेळ बदलू शकतील. मी हा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे."
टेलरने आपल्या कारकिर्दीत 110 कसोटी सामने खेळले आणि 44.30 च्या सरासरीने 7585 धावा केल्या. कसोटीत त्याने 19 शतकांसह 35 अर्धशतके झळकावली. त्याने एकदिवसीय सामन्यात आपल्या देशासाठी 8576 धावा केल्या. वनडेत त्याची सरासरी 48.18 होती. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 21 शतके आणि 51 अर्धशतके केली आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.