Rohit Sharma
Rohit Sharma Dainik Gomantak

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांपूर्वी 'हिटमॅन' गाळतोय घाम! रोहितचे फोटो व्हायरल

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांपूर्वी रोहित शर्मा वर्कआऊट करताना दिसला आहे.
Published on

Rohit Sharma: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेट संघाचा मायदेशातील हंगाम सुरू होणार आहे. या हंगामाला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आणि वनडे मालिकेने सुरुवात होईल. भारताला श्रीलंकेविरुद्ध ३ जानेवारीपासून ३ सामन्यांची टी२० आणि १० जानेवारीपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. दरम्यान, या मालिकांपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा जोरदार सराव करताना दिसला आहे.

रोहितला नुकत्याच संपलेल्या बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेदरम्यान हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुसऱ्या वनडेत स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताला चेंडू लागला होता. त्यामुळे ही दुखापत झालेल्या. या दुखापतीमुळे त्याला बांगलादेशविरुद्ध तिसरा वनडे सामना आणि कसोटी मालिका खेळता आली नव्हती.

Rohit Sharma
Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' तळपला! 2022 वर्षात रोहित-विराटसारखे महारथीही पडले मागे

आता तो या दुखापतीतून सावरला आहे की नाही, याबद्दल अद्याप बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्येही त्याच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह आहे.

पण, असे असले तरी रोहितने नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो वर्कआऊट करताना दिसत आहे. या फोटोंमधून तो दुखापतीतून चांगल्याप्रकारे सावरत असल्याचे संकेत मिळत आहेत.

यापूर्वीही तो मुंबईतील शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला होता. त्यामुळे आता असा कयास लावला जात आहे की रोहितला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देऊन दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्याचा वेळ दिला जाऊ शकतो. पण त्याचे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते.

हार्दिक पंड्याला मिळू शकते टी२० कर्णधारपद

अद्याप श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. पण, या मालिकांना केएल राहुल मुकण्याची दाट शक्यता आहे. त्याने त्याच्या लग्नासाठी सुटी घेतली असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे टी२० मालिकेसाठी जर रोहित आणि केएल राहुल दोघेही अनुपस्थित असतील, तर हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाचे टी२० कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com