रोहित शर्मा (Rohit Sharma) किती मोठा खेळाडू आहे हे सांगण्याची गरज नाही आणि त्याचे रेकॉर्ड्स याची साक्ष देतात. पण खेळाडूंचे टॅलेंट ओळखण्यातही रोहित शर्मा माहिर आहे, हे त्याच्या 11 वर्षांपुर्वीच्या ट्विटवरून सिद्ध होते आहे. त्याने 2011 मध्ये एका खेळाडूचा खेळ पाहून मोठी भविष्यवाणी केली होती, जी आता इंग्लंडमध्ये खरी ठरली. (Rohit Sharma tweet from 11 years ago is going viral)
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आहे, जो हळूहळू व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू बनत आहे. 2011 मध्ये सूर्यकुमारबद्दल रोहित काय म्हणाला होता? हे जाणून घेण्यापूर्वी तिसर्या टी-20 मधील सूर्यकुमारच्या फलंदाजीबद्दल जाणून घ्या.
सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 55 चेंडूत 117 धावांची शानदार खेळी खेळली आहे. हे सुर्यकुमारचे टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक होते. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. मात्र, तो भारताला विजय मिळवून देऊ शकलेला नाही.
पण, ज्या कठीण काळात त्याने ही खेळी खेळली, त्यात त्याने फलंदाज म्हणून आपला दर्जा आणखी मोठा केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताने 14 धावांत ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची विकेट गमावली तेव्हा सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता.
संघाच्या धावसंख्येत 17 धावांची भर पडली होती की रोहित शर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला होता. असे असतानाही सूर्यकुमार यादव घाबरला नाही आणि शानदार खेळी खेळली. त्याने श्रेयस अय्यरसोबत 62 चेंडूत 119 धावा जोडून टीम इंडियाला सामन्यात पुन्हा आणले. तो 19व्या ओव्हरमध्ये आऊट झाला, अन्यथा सामन्याचा निकाल बदलू शकला असता.
नॉटिंगहॅममधील सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीला संपूर्ण जग सलाम करत आहे. पण, 11 वर्षांपूर्वी रोहितने या खेळाडूचे टॅलेंट ओळखले होते. चेन्नईतील बीसीसीआय पुरस्कार सोहळ्या दरम्यान रोहितने सूर्यकुमारबद्दल एक गोष्ट सांगितली होती. तेव्हा तो म्हणाला होता की भारतीय क्रिकेटमध्ये लवकरच महान खेळाडू येतील, ज्यामध्ये मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवच्या खेळीवर नक्कीच लक्ष ठेवा.
सूर्यकुमार यादवने मर्यादित ओव्हरमधील क्रिकेटच्या सुरुवातीच्या काही डावांमध्ये रोहितची ही भविष्यवाणी खरी ठरविली असे म्हणायला हरकत नाही. इंग्लंडच्या पहिल्या नॉटिंगहॅम T20 मध्ये शतक झळकावून सुर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक फलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सूर्यकुमार भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. पण, आपल्या 360-डिग्री फलंदाजीने त्याने सांगितले की, भारतीय क्रिकेटला भविष्यातील फलंदाज सापडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.