टीम इंडियाने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात (India vs West Indies, 1st T20I) नेत्रदीपक विजय नोंदवला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा (West Indies) 6 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, या विजयानंतर रोहित शर्माने इशान किशनचा क्लास घेतला आहे. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याचा सहकारी सलामीवीर ईशान किशनशी बोलताना दिसला. ईशान किशनला (Ishan Kishan) हीट मॅन समजावताना दिसला. यावेळी रोहित बोलत असताना इशान डोकं खाली घालून फक्त कान देवून ऐकत होता. रोहित यावेळी ईशानचा क्लास घेत होता. पहिल्या T20 मध्ये हा स्फोटक डावखुरा सलामीवीर रणनितीनुसार खेळताना दिसला नाही. ईशान किशनने 35 धावा केल्या, मात्र त्यासाठी त्याने 42 चेंडू खेळले. ईशान किशनचा स्ट्राईक रेट 83.33 होता. त्याने 4 चौकार मारले. (Rohit Sharma Took Ishan Kishans Class)
दरम्यान, ईशान किशनला फलंदाजीत करताना खूप अडचणी आल्या. तो स्ट्राईक रोटेट करताना दिसला नाही. ईशानने फॅबियन ऍलनच्या चेंडूवर खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माने ईशान किशनला मोकळेपणाने खेळण्यास सांगितले होते. तसेच, स्ट्राईक रोटेट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासही ईशानला रोहीतने सांगितले होते.
तसेच, सामन्यानंतर रोहित शर्माने ईशान किशनचा बचाव केला. रोहित म्हणाला, ''फलंदाजीसाठी जा आणि फक्त स्ट्राइक बदलण्यावर लक्ष केंद्रित कर. ईशानला फक्त काही सामन्यांची गरज आहे, त्याच्यावर खूप दबाव आहे. ईशानला बिंदास्त वाटणे हे आमचे काम आहे.'' पहिल्या टी-20 मध्ये रोहित शर्मा एकीकडून संघर्ष करताना दिसला. तर दुसरीकडे ईशान किशनची सुरुवात खूपच संथ होती. रोहित शर्माने अवघ्या 19 चेंडूत 40 धावा केल्या, तर ईशान 12 षटके क्रीजवर राहूनही 35 धावा करु शकला.
सूर्यकुमार-व्यंकटेश अय्यर यांची चांगली फलंदाजी
टीम इंडियामध्ये (Team India) फिनिशर म्हणून ओळख असणाऱ्या सूर्यकुमार आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने मोकळेपणाने फलंदाजी करताना दिसले. सूर्यकुमारने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या. अय्यरनेही 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. भारताने पहिला सामना 7 चेंडू राखून 6 गडी राखून जिंकला. गोलंदाजीत टीम इंडियाची कामगिरी अप्रतिम होती. पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोईने पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. बिश्नोईने 4 षटकात केवळ 17 धावा देत 2 बळी घेतले. विशेष म्हणजे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यातही आले. बिश्नोईने केलेल्या शानदार कामगिरीला दाद देत रोहित शर्माने त्याचे कौतुक केले. आणि तो टीम इंडियाचे भविष्य असल्याचे देखील सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.