Rohit Sharma: सिडनीत 'हिटमॅन'चा डंका! शेवटच्या सामन्यात रचला इतिहास, सचिन-विराटच्या 'एलिट क्लब'मध्ये कोरलं नाव

Rohit Sharma 3rd ODI hundred: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने ५० वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावत आपल्या टीकाकारांना स्टाईलमध्ये उत्तर दिले
India vs Australia 3rd ODI
India vs Australia 3rd ODIDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Century: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने ५० वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावत आपल्या टीकाकारांना स्टाईलमध्ये उत्तर दिले. एकदिवसीय कारकिर्दीतील संभाव्य शेवटचा ऑस्ट्रेलियन दौरा असलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर, अंतिम सामन्यात त्याने १२१ धावांची नाबाद खेळी करत भारताला शानदार विजय मिळवून दिला.

भारताला विजयासाठी २३७ धावांचे आव्हान होते. कर्णधार शुभमन गिल (२४ धावा) लवकर बाद झाल्यानंतर रोहितने संयमाने डाव सांभाळला. त्याने अत्यंत शांतपणे खेळ करत १०५ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने विराट कोहलीने बहुमूल्य साथ दिली. या जोडीने १०० धावांची अत्यंत महत्त्वाची भागीदारी रचली आणि भारताला विजयाच्या जवळ आणले.

सचिन आणि कोहलीच्या क्लबमध्ये प्रवेश

या ऐतिहासिक शतकासह रोहित शर्माने एक मोठा टप्पा गाठला आहे. ५० आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण करणारा तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतरचा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तो एकूण १०वा क्रिकेटपटू बनला आहे. रोहितने आपल्या नाबाद १२१ धावांच्या खेळीत १३ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार ठोकले. विशेषतः, रोहित मधल्या फळीत इतका घातक दिसत होता की त्याला बाद करणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना शक्य झाले नाही.

India vs Australia 3rd ODI
Rohit Sharma: हिटमॅनचा ऐतिहासिक पराक्रम! 'असा' रेकॉर्ड करणारा बनला पहिला आशियाई फलंदाज

भारताचा ९ विकेट्सने मोठा विजय

भारताने हा तिसरा एकदिवसीय सामना नऊ विकेट्सने सहज जिंकला. रोहितचे नाबाद १२१ आणि कोहलीचे नाबाद ७४ धावांचे योगदान निर्णायक ठरले.

यापूर्वी गोलंदाजी करताना, भारतीय गोलंदाजांनीही शानदार प्रदर्शन केले. वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले, तर वॉशिंग्टन सुंदरने २ महत्त्वाचे बळी घेतले. गोलंदाजीतील या प्रभावी कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाला २३६ धावांवर रोखणे भारताला शक्य झाले.

या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १-२ अशा फरकाने गमावली असली तरी, अंतिम सामन्यातील दमदार कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे, त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित आणि कोहली पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com