Manish Jadhav
पर्थमधील पहिल्या वनडेत (8 धावा) फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने ॲडलेड येथे दुसऱ्या वनडेत शानदार फलंदाजी करत टीम इंडियाला मोठ्या स्कोरपर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले.
दुसऱ्या वनडेत कर्णधार शुभमन गिल (9) आणि विराट कोहली (0) एकाच षटकात बाद झाल्यावर रोहितने एका टोकाकडून संघाची बाजू भक्कमपणे सांभाळली.
मिचेल ओवेनच्या गोलंदाजीवर षटकार मारुन रोहितने SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) वनडेमध्ये 150 षटकार पूर्ण केले. तो हा पराक्रम करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला.
अर्धशतकी खेळीदरम्यान पहिला रन घेताच रोहित शर्माने वनडेत सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुलीला (9146 धावा) मागे टाकले.
54 धावांचा टप्पा गाठताच रोहितने ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलक्रिस्टला (9200 धावा) मागे टाकले आणि सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळवले.
रोहित शर्मा आता वनडेमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या आणि ख्रिस गेल यांच्या मागे चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रोहित शर्मा 73 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार मारले.
आता रोहितसमोर 3000 धावांचा टप्पा पूर्ण करण्याचे आव्हान आहे. गिल आणि कोहली लवकर बाद झाल्याने रोहितने केलेली ही खेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची ठरली.