ICC चा मोठा निर्णय! सामन्यात लागू होणार Stop Clock चा नियम; 1 मिनिटात दुसरी ओव्हर टाकली नाही तर...

Stop Clock Rule: एकदिवसीय विश्वचषक 2023 संपताच आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Stop Clock Rule: एकदिवसीय विश्वचषक 2023 संपताच आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

आत्तापर्यंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने षटक पूर्ण करण्यास उशीर केल्यास, त्या संघाला दंड म्हणून आपल्या एका क्षेत्ररक्षकाला सीमारेषेच्या आत आणावे लागत होते. मात्र आता हा दंड बदलण्यात आला आहे.

Team India
ICC Change World Cup Venue: 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचे ICC ने बदलले ठिकाण, श्रीलंकेला दुसरा मोठा झटका!

उशीरा षटकांसाठी धावांचा दंड

आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार, आता एका षटकानंतर पुढचे षटक सुरु करण्यास संघाने एक मिनिटापेक्षा जास्त उशीर केल्यास, डावात तीन वेळा ही चूक केल्यास 5 धावांचा दंड आकारला जाईल. या नियमाला स्टॉप क्लॉक नियम म्हणतात.

फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा मोठा फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत आयसीसीचा हा निर्णय धक्कादायक आहे. या निर्णयामुळे गोलंदाजी करत असलेल्या संघाने एका षटकानंतर पुढील षटक सुरु करण्यास उशीर केल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मोफत मिळतील.

Team India
ICC कडून वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा 12 जणांचा सर्वोत्तम संघ जाहीर! कर्णधार रोहितसह 6 भारतीयांना संधी

हा नियम डिसेंबर 2023 पासून सुरु होईल

तथापि, आयसीसीने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत पुरुषांच्या एकदिवसीय आणि T20I क्रिकेटमध्ये परिक्षणाच्या आधारावर कायमस्वरुपी लागू केला जाईल. सध्या हा निर्णय कितपत प्रभावी ठरतो, यावर या निर्णयाच्या निकालावर लक्ष ठेवले जाणार आहे.

त्यानंतरच त्याची कायमस्वरुपी अंमलबजावणी करता येईल का, याचा निर्णय होईल. अशा परिस्थितीत हा नियम कायमस्वरुपी लागू केल्यास पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघांना याच नियमानुसार खेळावे लागेल. यासाठी सर्व संघांनी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे, जेणेकरुन त्यांना विश्वचषकात (World Cup) त्याचे परिणाम भोगावे लागू नयेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com