Asia Cup 2023: हिट मॅन मोडणार ख्रिस गेलचा महा रेकॉर्ड? पुढच्या दोन सामन्यात मारावे लागणार एवढे षटकार

Team India News: टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या अंतिम फेरीसह भारताला अजून दोन सामने खेळायचे आहेत.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

Asia Cup 2023 News: भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप 2023 च्या सुपर-4 टप्प्यातील सामना शुक्रवारी (15 सप्टेंबर) दुपारी 3 वाजल्यापासून कोलंबो येथे खेळवला जाईल. टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या अंतिम फेरीसह भारताला अजून दोन सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडू शकतो.

रोहित शर्मा ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला

टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने पुढील 2 सामन्यांमध्ये आणखी 9 षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल. जर रोहित शर्माने आणखी 9 षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 554 षटकार पूर्ण करेल. वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 553 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माने पुढील 2 सामन्यांमध्ये आणखी 9 षटकार मारले तर तो ख्रिस गेलला मागे टाकेल आणि त्याचा विश्वविक्रम मोडेल.

Rohit Sharma
Asia Cup 2023: चायनामन मोडणार इरफान पठाणचा रेकॉर्ड, पुढच्या दोन सामन्यात घ्याव्या लागणार एवढ्या विकेट्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 553 षटकार

2. रोहित शर्मा (भारत) – 545 षटकार

3. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) - 476 षटकार

4. ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड) – 398 षटकार

5. मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) - 383 षटकार

6. महेंद्रसिंह धोनी (भारत) – 359 षटकार

Rohit Sharma
Asia Cup 2023: भारतासमोर फायनलमध्ये कोणाचं आव्हान? पाकिस्तान-श्रीलंका संघांचं भवितव्य 'या' सामन्यावर

जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनेल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 448 सामन्यांच्या 469 डावांमध्ये 545 षटकार मारण्याचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या नावावर आहे. आशिया कप 2023 मध्ये 9 षटकार मारुन, रोहित शर्मा ख्रिस गेलला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 554 षटकार मारणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनेल. सध्या विराट कोहलीही या मोठ्या विक्रमापासून दूर आहे. विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 282 षटकार मारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com