IND vs AFG: एकाच सामन्यात रोहित शर्माने नोंदवला विश्वविक्रम अन् लाजिरवाणा रेकॉर्डही, वाचा सविस्तर

Rohit Sharma: अफगाणिस्तानविरुद्ध इंदूरला झालेला सामना रोहित शर्मासाठी अनोखा ठरला असून या एकाच सामन्यात त्याने विश्वविक्रमही केला आहे आणि एक नकोसा विक्रमही त्याच्या नावावर झाला आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaPTI

India vs Afghanistan, 2nd T20I match at Indore, Rohit Sharma:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात रविवारी (14 जानेवारी) टी20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरला होत आहे. हा सामना रोहित शर्मासाठी अनोखा ठरला आहे. कारण या एकाच सामन्यात त्याने आजपर्यंत कोणालाच न जमलेला विश्वविक्रमही केला, तसेच एक नकोसा विक्रमही त्याच्या नावावर झाला आहे.

रोहितचा विश्वविक्रम

अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी20 सामना हा रोहित शर्माचा कारकिर्दीतील 150 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे. त्यामुळे 150 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आलेला नाही.

Rohit Sharma
Rohit Sharma: हिटमॅनचा विश्वविक्रम! T20I मध्ये 'असा' पराक्रम करणारा बनला पहिलाच क्रिकेटर

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामने खेळण्याच्या यादीत रोहित पाठोपाठ आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आहे. त्याने 134 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामने खेळणारे क्रिकेटपटू (14 जानेवारी 2024 पर्यंत) -

  • 150 सामने - रोहित शर्मा

  • 134 सामने - पॉल स्टर्लिंग

  • 128 सामने - जॉर्ज डॉकरेल

  • 124 सामने - शोएब मलिक

  • 122 सामने - मार्टिन गप्टील

रोहितच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल उतरले.

मात्र, पहिल्याच षटकात रोहित पहिलाच चेंडू खेळत असताना फझलहक फारुकीने त्रिफळाचीत केले. त्यामुळे रोहितला या मालिकेत सलग दुसऱ्यांदा शुन्यावर माघारी परतावे लागले. तो मोहालीला झालेल्या पहिल्या टी20 सामन्यातही शुन्यावर धावबाद झाला होता.

Rohit Sharma
IND vs USA FIH Women Olympic Qualifier: अमेरिकेने टीम इंडियाची उडवली दाणादाण; ऑलिम्पिकची सीट धोक्यात

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर 12 वेळा शुन्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही नोंदवला गेला आहे. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या यादीत त्याच्यासह दुसऱ्या क्रमांकावर राबारे इराकोझे आणि केविन ओ'ब्रायन हे संयुक्तरित्या आहेत. रवांडाचा राबारे आणि आयर्लंडचा ओ'ब्रायन हे दोघेही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 12 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आहे. तो 13 वेळा शुन्यावर बाद झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com