IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू कुलदीप यादव IPL मधून बाहेर

कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) रिकव्हर होण्यास किती वेळ लागेल ते निश्चितपणे सांगता येत नाही. रणजी ट्रॉफी संपण्यापूर्वीच तो सामना खेळण्यास तयार असेल.
कुलदीपला (Kuldeep Yadav)  गुडघ्याची दुखापत झाली असून, तो यूएईहून (UAE) पुन्हा भारतात परतला आहे.
कुलदीपला (Kuldeep Yadav) गुडघ्याची दुखापत झाली असून, तो यूएईहून (UAE) पुन्हा भारतात परतला आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आयपीएलमधून (IPL) बाहेर पडला आहे. कुलदीपला गुडघ्याची दुखापत झाली असून, तो यूएईहून (UAE) पुन्हा भारतात परतला आहे. आगामी घरगुती हंगामातील बहुतेक सामन्यांमधून तो बाहेर होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाबाहेरल्या (Indian Team) कुलदीपला या मोसमात कोलकात्याकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी केकेआर संघात निवड न झाल्याने कुलदीपने संघ व्यवस्थापन आणि कर्णधार इऑन मॉर्गनला (Captain Eoin Morgan) प्रश्न विचारला होता.

कुलदीपला (Kuldeep Yadav)  गुडघ्याची दुखापत झाली असून, तो यूएईहून (UAE) पुन्हा भारतात परतला आहे.
IPL 2021: कोलकत्याचा 'विजयी रथ'; मुंबईला हरवत चौथ्या स्थानावर

कुलदीप भारतीय संघाबाहेर आहे आणि स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी त्याला दीर्घ पुनर्वसन प्रक्रियेतून जावे लागू शकते. आयपीएल संघांशी निगडीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला बोलताना सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की कुलदीपला संयुक्त अरब अमिरातीमध्ये सराव सत्रादरम्यान गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षण करताना बहुदा त्याचा गुडघा वाकला असण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये तो पुढे भाग घेण्याची शक्यता नव्हती आणि म्हणूनच त्याला भारतात परत पाठवण्यात आले आहे, त्याला फिट होण्यास वेळ लागू शकतो. गुडघ्याच्या दुखापती सामान्यतः गंभीर असतात. प्रथम त्याला एनसीएमध्ये फिजिओथेरपीसाठी पाठविण्यात येईल, त्यानंतर हलका व्यायाम आणि नंतर नेट सत्र, ही संपूर्ण प्रक्रिया खूप मोठी आहे.

त्याला रिकव्हर होण्यास किती वेळ लागेल ते निश्चितपणे सांगता येत नाही. रणजी ट्रॉफी संपण्यापूर्वीच तो सामना खेळण्यास तयार असेल. कुलदीपने प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्कुलम यांचा एक फोटो ट्विटरवर फोटो पोस्ट केला असून, त्यात त्याने त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण हा फोटो जुना असून, कुलदीप भारतात परतला आहे, आणि त्याच्या पायावर शस्त्रक्रिया देखील केली आहे. असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कुलदीपला (Kuldeep Yadav)  गुडघ्याची दुखापत झाली असून, तो यूएईहून (UAE) पुन्हा भारतात परतला आहे.
IPL 2021: चहल,मॅक्सवेलची फिरकी तर हर्षलची हॅट्रीक, RCBच्या गोलंदाजांसमोर MI गारद !

सिडनीमध्ये पाच विकेट घेतल्यानंतर कुलदीपसाठी गेली दोन वर्षे चढ-उतारांनी भरलेली आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला परदेशात भारताचा नंबर एक फिरकीपटू म्हटले होते. भारतीय संघ व्यवस्थापनाने फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवरही त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. तो मुख्य संघात असूनही डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमला स्टँडबाय खेळाडू म्हणून खेळविण्यात आले आहे.

कानपूरच्या 26 वर्षीय खेळाडूने भारतासाठी 7 कसोटी, 65 एकदिवसीय आणि 23 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण 174 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंका दौऱ्यात तो भारतासाठी शेवटचा खेळला होता. त्याने एकदिवसीय सामन्यात 48 धावा देऊन दोन विकेट आणि टी -20 सामन्यांमध्ये 30 धावांसाठी दोन विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com