Mumbai Indians: रांचीच्या विकेटकिपरला मुंबई इंडियन्सने दिली संधी, आता ट्रेनिंगसाठी गाठणार इंग्लंड

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने 20 वर्षीय विकेटकिपरची ट्रेनिंगसाठी निवड केली आहे.
Mumbai Indians IPL
Mumbai Indians IPLDainik Gomantak
Published on
Updated on

Jharkhand Cricketer Robin Minz Selected by Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीगमधून आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी आपली प्रतिभा दाखवत वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात देशातील कानाकोपऱ्यातून क्रिकेटपटू येऊन खेळताना दिसतात. आता लवकरच झारखंडची राजधानी रांचीमधील असाच एक युवा क्रिकेटपटू आयपीएलमध्ये दिसू शकतो. या क्रिकेटपटूचे नाव रॉबिन मिंझ आहे.

खरंतर रांची शहर एमएस धोनीसाठीही ओळखले जाते. धोनी रांचीचा रहिवासी आहे. तिथेच तो लहानाचा मोठा झाला, तसेच सुरुवातीचे क्रिकेटचे धडेही त्याने तिथेच घेतले. आता याच शहरातून येणाऱ्या रॉबिन मिंझचेही असेच मोठा क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न आहे.

Mumbai Indians IPL
Ishant Sharma on MS Dhoni: 'जर माहित होतं...', जेव्हा धोनी विराटवर चिडलेला, इशांतने ऐकवला किस्सा

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार रॉबिन मिंझची निवड मुंबई इंडियन्सने ट्रेनिंगसाठी केली असून आता तो इंग्लंडला जाणार आहे. त्यामुळे तो मुंबई इंडियन्ससाठी निवड होणारा झारखंडचा पहिला आदिवासी क्रिकेटपटू आहे. दरम्यान, याबद्दल अद्याप मुंबई इंडियन्सकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

त्याच्या निवडीबद्दल त्याने सांगितले की 'या निवडीबद्दल मी खूप खुश आहे. गेल्यावर्षी माझी निवड थोडक्यात राहिली होती. माझ्या यशात माझे प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य आणि असिफ सप यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मला बारकाईने गोष्टी समजावल्या आणि मेहनत करण्यासाठी प्रेरणा दिली.'

रॉबिन 8 व्या वर्षापासून क्रिकेट खेळतो. त्याच्यातील क्रिकेटची प्रतिभा त्याच्या वडिलांनी ओळखली. त्यांच्या सल्ल्यानुसारच त्याने क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला.

Mumbai Indians IPL
MS Dhoni Video: धोनीला पत्नीसमोरच एअर हॉस्टेसने केले चॉकलेट्स ऑफर, पाहा 'कॅप्टनकूल'ची रिऍक्शन

याशिवाय रॉबिनने त्याच्या यशात त्याच्या आई-वडिलांचेही मोठे योगदान असल्याचे सांगितले. त्याने सांगितले की वडील आर्मीमध्ये असताना आई अकादमीमध्ये त्याला घेऊन जायची. तसेच त्याने सांगितले की सध्या तो नामकुममधील सोनेट क्रिकेट क्लबकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळतो.

त्याचबरोबर रॉबिनने असेही सांगितले की त्याला यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सनेही ट्रायल्ससाठी बोलावले होते. त्यातील दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने ट्रायल्स दिली पण त्याची निवड होऊ शकली नाही.

दरम्यान, 20 वर्षीय रॉबिन झारखंडकडून वयोगटातील क्रिकेट स्पर्धा खेळला आहे. पण अद्याप त्याची वरिष्ठ संघात निवड झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com