राजस्थान रॉयल्सचा स्टार चमकला, सलग सहावं अर्धशतक ठोकत केला 'विश्वविक्रम'

Riyan Parag: आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज रायन पराग मागील काही दिवसांपासून शानदार फॉर्ममध्ये आहे.
Riyan Parag World Record
Riyan Parag World RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Riyan Parag World Record: आसाम क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज रायन पराग मागील काही दिवसांपासून शानदार फॉर्ममध्ये आहे.

पहिल्या इमर्जिंग आशिया कपमध्ये रायनने बॅट आणि बॉलने चमत्कार केला होता. त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीमध्येही चमकला होता.

आता त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) विश्वविक्रम केला आहे. त्याने टी-20 स्पर्धेत सलग सहावे अर्धशतक झळकावले आहे. यासह त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

याआधी, जगभरातील कोणत्याही T20 लीग किंवा टूर्नामेंटमध्ये असे कधीच घडले नव्हते की, एका फलंदाजाने सलग सहा सामन्यांमध्ये पन्नास धावा केल्या असतील. यासह पराग या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

त्याने सात सामन्यांच्या सात डावात 440 धावा केल्या आहेत. परागने सहा सामन्यात अर्धशतक केले. ज्या सामन्यात त्याला अर्धशतकही करता आले नाही, त्या सामन्यात त्याने 45 धावा केल्या. आसामने सातव्या सामन्यात अपराजित केरळचा (Kerala) 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात परागने नाबाद 57 धावा केल्या आणि एक विकेटही घेतली.

Riyan Parag World Record
IPL-2024 चा ऑक्शन भारतात नाही तर 'या' ठिकाणी होणार, तारीखही जाहीर

SMAT 2023 मध्ये रियान परागची कामगिरी

केरळ विरुद्ध नाबाद 57

हिमाचल प्रदेश विरुद्ध 72

चंडीगड विरुद्ध 76

सिक्कीम विरुद्ध 53 नाबाद

सर्व्हिसेज विरुद्ध 76 नाबाद

बिहार विरुद्ध 61

ओडिशा विरुद्ध 45

Riyan Parag World Record
IPL गाजवलेल्या क्रिकेटवर दु:खाचा डोंगर! मुंबईतील इमारतीच्या आगीत गमावला बहीण अन् भाच्याने जीव

दुसरीकडे, रियान परागच्या संघाला सध्याच्या स्पर्धेत त्याच्या उत्कृष्ट कामगिरीची फळेही मिळत आहेत. त्याच्या संघाने ब गटातील सातपैकी पाच सामने आतापर्यंत जिंकले आहेत. या संघाने या स्पर्धेत सलग सहा सामने जिंकणाऱ्या संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील केरळ संघाचा पराभव केला.

गुणतालिकेत आसाम 20 गुणांसह ब गटात तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, परागच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने सध्या 95 टी-20 सामन्यांच्या 83 डावांमध्ये 1973 धावा केल्या आहेत.

त्याची सरासरी 29.8 आहे आणि स्ट्राइक रेट 142 पेक्षा जास्त आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 17 अर्धशतके केली आहेत. त्याच्या नावावर 39 विकेट्सही आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com