IPL गाजवलेल्या क्रिकेटवर दु:खाचा डोंगर! मुंबईतील इमारतीच्या आगीत गमावला बहीण अन् भाच्याने जीव

Mumbai Fire: सोमवारी मुंबईतील इमारतीला लागलेल्या आगीत भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या बहीण आणि भाच्याने जीव गमावला आहे.
Kandivali Mumbai Building Fire
Kandivali Mumbai Building FireANI
Published on
Updated on

India cricketer Paul Valthaty's sister and Nephew die in Kandivali, Mumbai fire:

सोमवारी मुंबईतील कांदिवली भागात एक दुर्दैवी घटना घडली. कांदिवली भागातील एका रहिवाशी इमारतीला अचानक आग लागली होती. या आगीत भारताचा माजी क्रिकेटपटू पॉल वॉल्थटीची बहिण आणि भाचा यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार कांदिवलीतील विणा संतूर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आठ मजली इमारतीला आग लागली होती. या इमारतीत वॉल्थटी कुटुंब चौथ्या मजल्यावर राहते.

या इमारतीला आग लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी आपापला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात पॉल वॉल्थटी याची बहीण ग्लोरी वॉल्थटी आणि तिचा ८ वर्षीय मुलगा जोशुओ जेम्स रॉबर्ट हे आगीत सापडले.

Kandivali Mumbai Building Fire
World Cup 2023 Video: न्यूझीलंडविरुद्ध शमीने पटकवला 'मॅन ऑफ द मॅच', पाहा कशा घेतल्या 5 विकेट्स

दरम्यान, तिची मुलगी आणि पती यात वचावले आहेत. खरंतर ग्लोरी आणि तिचे कुटुंब स्कॉटलंडला राहाते. परंतु, ती नुकतीच आजारी असलेल्या पालकांना भेटण्यासाठी मुंबईत आली होती.

मुंबई अग्निशामत दलाचे मुख्य अधिकारी रविंदा अंबुलगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या मजल्यावरील जळत्या दिव्यामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. तसेच इमारतीत अग्शिशामक यंत्रणा बसवण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, असेही समोर आले आहे की या आगीत आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये वॉल्थटी कुटुंबाच्या दोन मदतनीस राजेश्वरी अधे आणि लक्ष्मी बुरा यांचाही समावेश आहे.

Kandivali Mumbai Building Fire
World Cup 2023: गतविजेते इंग्लंड गाळात, अफगाणिस्तानच्या पाकिस्तानवरील वियानंतर पाँइंट्स टेबलमध्ये उलथापालथ

वॉल्थटी खेळलाय आयपीएल

वॉल्थटीबद्दल सांगायचे झाल्यास तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. तसेच आयपीएलमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघाकडून आयपीएल खेळला आहे.

त्याने 23 आयपीएल सामने खेळले असून १ शतक आणि २ अर्धशतकांसह ५०५ धावा केल्या आहेत. त्याने २०११ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध केलेल्या नाबाद १२० धावांच्या खेळीने त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com