Ranji Trophy: रियान परागची तुफान फटकेबाजी! 56 चेंडूत सेंच्युरी करत रचला मोठा विक्रम

Riyan Parag Century: आसामचा कर्णधार रियान परागने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 56 चेंडूत शतक करत मोठा विक्रम केला आहे.
Riyan Parah
Riyan Parah

Riyan Parag 56 ball century during Assam vs Chhattisgarh, Ranji Trophy 2023-24:

रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम चालू झाला आहे. या हंगामात रायपूरला आसाम आणि छत्तीगढ या संघात सामना झाला. या सामन्यात छत्तीसगढने 10 विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले, तरी आसामचा कर्णधार रियान परागने आक्रमक शतक करत एक मोठा विक्रम नावावर केला.

या सामन्यात चौथ्या दिवशी आसामकडून दुसऱ्या डावात रियानने 56 चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने शानदार खेळ कायम करत 87 चेंडूत 11 चौकार आणि 12 षटकारांसह 155 धावांची खेळी केली.

Riyan Parah
Ranji Trophy Cricket Tournament: सुमार कामगिरीमुळेच गोवा पराभवाच्या द्वारी

या खेळीदरम्यान त्याने रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रियान दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ऋषभ पंत आहे. पंतने 2016 च्या हंगामात झारखंड विरुद्ध 48 चेंडूत शतक केले होते.

रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक करणारे क्रिकेटपटू -

  • 48 चेंडू - ऋषभ पंत (दिल्ली विरुद्ध झारखंड, 2016)

  • 56 चेंडू - रियान पराग (आसाम विरुद्ध छत्तीसगढ, 2023)

  • 69 चेंडू - नमन ओझा (मध्यप्रदेश विरुद्ध कर्नाटक, 2015)

  • 72 चेंडू - एकलव्य द्विवेदी (उत्तर प्रदेश विरुद्ध रेल्वे, 2015)

  • 82 चेंडू - ऋषभ पंत (दिल्ली विरुद्ध झारखंड, 2016)

  • 86 चेंडू - केएल भरत (आंध्र प्रदेश विरुद्ध गोवा, 2015)

Riyan Parah
Ranji Trophy: मुंबईविरुद्ध मॅच खेळण्यासाठी पोहचल्या बिहारच्या दोन टीम, पोलिसांनाही करावी लागली मध्यस्थी

आसामचा पराभव

रियानने दीडशतक केल्याने आसामने दुसऱ्या डावात 53.2 षटकात सर्वबाद २५४ धावा केल्या. मात्र, आसामला पहिल्या डावात फॉलोऑन मिळाला होता. त्यामुळे त्यांना दुसरा डाव संपल्यानंतर छत्तीसगढसमोर 87 धावांचेच आव्हान देता आले. हे आव्हान छत्तीसगढने २० षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. यासह हा सामनाही जिंकला.

या सामन्यात छत्तीसगढने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 116.2 षटकात सर्वबाद 327 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर आसामचा पहिला डाव 95 षटकात 159 धावंवरच संपला.

त्यामुळे 168 धावांची आघाडी छत्तीसगढला मिळाल्याने त्यांनी आसामला फॉलोऑन दिला होता. फॉलोऑननंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या रियानने आक्रमक खेळ केल्याने आसामला किमान छत्तीसगढसमोर विजयासाठी लक्ष्य ठेवता आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com