Ranji Trophy Cricket Tournament: सुमार कामगिरीमुळेच गोवा पराभवाच्या द्वारी

Ranji Trophy Cricket Tournament: त्रिपुराविरुद्ध 501 धावांच्या आव्हानासमोर 3 बाद 48
Ranji Trophy Cricket Tournament
Ranji Trophy Cricket TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy Cricket Tournament: फलंदाजी आणि गोलंदाजीतील अतिशय सुमार कामगिरीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच लढतीत गोव्याचा संघ मोठ्या पराभवाच्या द्वारी आहे.

एलिट क गट लढतीत त्रिपुराने फॉलोऑन न लादता दुसऱ्या डावात फलंदाजी केली आणि ५०१ धावांचे आव्हान दिले. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर रविवारी पाहुण्या संघाची ३ बाद ४८ अशी स्थिती झाली.

आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी सोमवारी गोव्याला मोठे दिव्य पार करावे लागेल.

ते अजून ४५२ धावांनी मागे आहेत. कमजोर फलंदाजीमुळे गोव्याचा पहिला डाव रविवारी सकाळी ४ बाद ५३ वरून १३५ धावांत आटोपला. त्यामुळे त्रिपुराला ३४९ धावांची आघाडी मिळाली, परंतु त्यांनी गोव्यावर फॉलोऑन लादला नाही.

दुसऱ्या डावातही यजमान संघाने पाहुण्या संघातील गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्रिपुराने दुसरा डाव ५ बाद १५१ धावांवर घोषित करून एकूण ५०० धावांची आघाडी संपादन केली.

गोव्याची दुसऱ्या डावातही घसरगुंडी उडाली. सुयश प्रभुदेसाईला सलामीला बढती देण्याचा प्रयोग सलग दुसऱ्या डावात फसला. मंथन खुटकरही अपेक्षापूर्ती करू शकला नाही, तर अनुभवी स्नेहल कवठणकर जबाबादीर पेलू शकला नाही.

त्यामुळे ३३ धावांतच ३ गडी गमावल्यामुळे गोव्याला पराभव खुणावू लागला. दिवसअखेर के. व्ही. सिद्धार्थ १६, तर नाईट वॉचमन लक्षय गर्ग नऊ धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा, पहिला डाव: ४८४

गोवा, पहिला डाव (४ बाद ५३ वरून) ः ४८.५ षटकांत सर्वबाद १३५ (के. व्ही. सिद्धार्थ ४, दर्शन मिसाळ १४, दीपराज गावकर ४१, अर्जुन तेंडुलकर ११, मोहित रेडकर ६, लक्षय गर्ग ५, विजेश प्रभुदेसाई नाबाद ०, मणिशंकर मुरासिग ३-४०, राणा दत्ता ३-४१, अभिजित सरकार ४-२४).

त्रिपुरा, दुसरा डाव: ३३.४ षटकांत ५ बाद १५१ (बिशाल घोष ३३, बिक्रमकुमार दास ४५, श्रीदम पॉल नाबाद ३२, सुदीप चटर्जी १८, रजत डे १४, मणिशंकर मुरासिंग २, अर्जुन तेंडुलकर ५-१-१४-०, लक्षय गर्ग ३-०-११-०, विजेश प्रभुदेसाई ५-१-१५-०, दीपराज गावकर २-०-९-०, मोहित रेडकर १०-१-४८-२, दर्शन मिसाळ ८.४-०-४८-३).

गोवा, दुसरा डाव: २० षटकांत ३ बाद ४८ (सुयश प्रभुदेसाई ९, मंथन खुटकर ६, सिद्धार्थ नाबाद १६, स्नेहल कवठणकर ६, लक्षय गर्ग नाबाद ९, मणिशंकर मुरासिंग १-५, राणा दत्ता १-१४, अभिजित सरकार १-१६).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com