Rishabh Pant: पंत रमला शेजारच्या मुलांबरोबर गोट्या खेळण्यात, Video होतोय तुफान व्हायरल

Rishabh Pant playing Marbles: ऋषभ पंत शेजारच्या मुलांबरोबर रस्त्यावर गोट्या खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Rishabh Pant playing Marbles
Rishabh Pant playing MarblesInstagram

Rishabh Pant playing Marbles:

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेले वर्षभर क्रिकेटपासून दूर आहे. पण आता तो आगामी इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी तो लहान मुलांबरोबर गोट्या खेळताना दिसला आहे.

पंतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला त्याच्या शेजारच्या लहान मुलांबरोबर गोट्या खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

Rishabh Pant playing Marbles
Rishabh Pant: 'तेव्हा वाटलं आपली पृथ्वीवरील वेळ संपली...' अपघातावेळीच्या भावनांबद्दल पंत झाला व्यक्त

या व्हिडिओमध्ये दिसते की पंतने तोंडाला मास्क लागवले असून त्याच्या आजूबाजूला काही मुले आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना पंत गोट्या खेळण्याचा आनंद लुटत आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये असेही लिहिले की तो खूप वर्षांनी गोट्या खेळला.

पंतचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस गंभीर रुडकीला येत असताना कार अपघात झाला होता. या अपघातात त्याची कार पूर्णपणे जळाली होती, पण तो सुदैवाने वाचला.

दरम्यान, या अपघातात त्याला बऱ्याच जखमा झाल्या, तसेच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यामुळे त्याला तेव्हापासून अद्याप स्पर्धात्मक क्रिकेट खेळता आलेले नाही. पण आता पंत या दुखापतींमधून सावरला असून तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Rishabh Pant playing Marbles
Rishabh Pant: अर्रे आवाज कुणाचा...! धोनीच्या निवृत्तीनंतर एकट्या पंतने केल्या 6 यष्टीरक्षकांपेक्षा जास्त धावा

त्याला लवकरच आयपीएल खेळण्यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून (NCA) मंजूरी मिळू शकते. दरम्यान, त्याला जर मंजूरी मिळाली, तर तो यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल.

तसेच तो सुरुवातीला काही सामने केवळ कर्णधार आणि फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे. तो लगेचच यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता कमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com