Video: रिंकूचा झंझावात कायम, तीन चेंडूतच संपवला सामना

UP T20 2023 Rinku Singh Sixes: काशी रुद्र आणि मेरठ मावेरिक्स यांच्यात झालेल्या सामन्यात रिंकूने सुपर ओव्हरमध्ये आपल्या संघासाठी सर्वस्व अर्पण केले.
 Rinku Singh
Rinku Singh Dainik Gomantak
Published on
Updated on

UP T20 2023 Rinku Singh Sixes: आयपीएल स्टार आणि टीम इंडियासाठी शानदार पदार्पण करणाऱ्या रिंकू सिंहने 2023 च्या आशियाई गेमपूर्वी यूपी टी-20 लीगमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे.

काशी रुद्र आणि मेरठ मेवरिक्स यांच्यात झालेल्या सामन्यात रिंकूने सुपर ओव्हरमध्ये आपल्या संघासाठी सर्वस्व अर्पण केले. केकेआरच्या या स्टारने सलग तीन षटकार ठोकत संघाला विजयापर्यंत नेले.

दरम्यान, सुपर ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती आणि सर्वांच्या नजरा रिंकूवर होत्या. सुपर ओव्हरमधील पहिला बॉल डॉट गेला. परंतु त्यानंतर रिंकूने आश्चर्यकारक कामगिरी केली.

सलग तीन षटकार मारुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, यावेळीही एक डावखुरा गोलंदाज रिंकूला गोलंदाजी करत होता.

 Rinku Singh
Rinku Singh: 'तेव्हा आईने उधारीवर पैसे घेतले, मी आता...', टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर रिंकू झाला व्यक्त

रिंकूचा जलवा

रिंकूने मारलेल्या षटकाराने चाहत्यांना त्याच्या आयपीएल 2023 मधील कामगिरीची आठवण करुन दिली. 20व्या षटकात यश दयालच्या चेंडूवर सलग पाच षटकार मारुन कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) सामना जिंकल्यावर रिंकू प्रकाशझोतात आला होता. रिंकूने पुन्हा एकदा यश दयाल याच्या टीमविरुद्ध हा पराक्रम केला आहे.

दुसरीकडे, प्रथम फलंदाजी करताना मेरठने 181/4 अशी एकूण धावसंख्या नोंदवली. रिंकूला मैदानात संघर्ष करावा लागला. 22 चेंडूत 15 धावा करुन तो बाद झाला. माधव कौशिकने 52 चेंडूत नाबाद 87 धावा करत मोठी धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात करण शर्माच्या 58 धावा आणि शिवम बन्सलच्या अर्धशतकाच्या जोरावर काशी रुद्रस लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचला परंतु विजयी रेषेच्या पुढे जाऊ शकला नाही. शेवटी सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला, जिथे रिंकूने मेरठसाठी धडाकेबाज कामगिरी केली.

 Rinku Singh
Yuvraj Singh: युवराज-हेजलला कन्यारत्न; सोशल मिडियावर फोटो शेअर करत दिली गोड बातमी

आशियाई गेमसाठी निवड

आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी रिंकूला सरावाची चांगली संधी मिळाली आहे. 25 वर्षीय रिंकू एशियाडसाठी टीम इंडियाचा भाग आहे. रिंकू आता एक कॅप्ड खेळाडू आहे.

त्याने 18 ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याचे T20I पदार्पण केले. रिंकूला दुसऱ्या T20I मध्ये फलंदाजीची संधी मिळाली. त्याने 21 चेंडूत 38 धावा करत भारताला (India) 185/5 च्या मोठ्या स्कोअरपर्यंत नेले. आशियाई स्पर्धेत रिंकू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com