पणजी : इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धा दोन वेळा जिंकलेल्या चेन्नईयीन एफसीने (Chennaiyin FC) बचावफळीत रीगन सिंग (Reagan Singh) याला कायम राखले आहे. तो चेन्नईतील संघातर्फे 2023 पर्यंत खेळेल.
मणिपूरचा तीस वर्षीय रीगन 2020-21 मोसमातील गोव्यात झालेल्या आयएसएल स्पर्धेत चेन्नईयीन एफसी संघात दाखल झाला होता. त्यापूर्वी त्याने गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रतिनिधित्व केले होते. आगामी दोन वर्षांसाठी आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल रीगनने चेन्नईयीन परिवाराचे आभार मानले आहेत. या संघातर्फे पहिल्या मोसमात आपण चांगले योगदान दिले, तसेच खेळाडू या नात्याने प्रगती साधल्याचा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. चेन्नईयीनला आयएसएल करंडक जिंकून देण्यास मदत करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.
रीगनच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची सुरवात 2012 साली झाली. त्या मोसमात तो आय-लीग स्पर्धेत रॉयल वाहिंगडोह संघातर्फे खेळला. शिलाँगमधील या संघाचे तीन वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर तो नॉर्थईस्ट युनायटेड संघात झाला आणि आयएसएल स्पर्धेत पाच वर्षे खेळण्याचा अनुभव प्राप्त केला. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत तो चेन्नईयीनकडून 18 सामने खेळला, त्यात संघाने सहा लढतीत एकही गोल स्वीकारला नाही. रीगनने एका असिस्टचीही नोंद केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.