Goa : डिसेंबर पर्यंत गोव्यात 150 प्रकल्प होणार पुर्ण - मुख्यमंत्री

सेंद्रिय शेतीसाठी सरकार वचनबद्ध,सेंद्रिय शेतीसाठी कृषी खात्याने शेतकऱ्यांचे 500 गट तयार केले असुन त्याचा चांगला परिणाम लवकरच दिसुन येईल
Goa : डिसेंबर पर्यंत गोव्यात 150 प्रकल्प होणार पुर्ण - मुख्यमंत्री
Published on
Updated on

फातोर्डा : सरकार गोव्याला स्वयंपुर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेली सिकेटी फुटबॉल मैदानाचे लोकार्पण केल्यानंतर सांगितले. त्यासाठी डिसेंबर पर्यंत गोवा प्रगती योजने अंतर्गत 150 विविध प्रकारचे प्रकल्प जीएसआयडीसी, सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते यांच्यामार्फत गोव्यातील सर्व मतदार संघात खास करुन पंचायत क्षेत्रामध्ये पुर्ण केले जातील. त्यासाठी पंचायतीचे सहकार्य अपेक्षित आहे व त्यासाठी पंचायतींनी पुढाकार घेतला पाहिजे. असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

शिवाय सेंद्रिय शेतीसाठी कृषी खात्याने शेतकऱ्यांचे 500 गट तयार केले असुन त्याचा चांगला परिणाम लवकरच दिसुन येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. गोवा स्वयंपुर्ण बनविण्यासाठी सर्वच गोमंतकीयांनी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com