IPL 2022 मध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील RCB ने IPL 2022 मध्ये नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात तीन गडी राखून विजय नोंदवून त्यांचे खाते उघडले. (RCB player Harshal Patel sets new record against KKR in IPL)
या सामन्यादरम्यान आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू आणि गेल्या मोसमातील पर्पल कॅप विजेता हर्षल पटेलने (Harshal Patel) एक खास विक्रम आपल्या नावावर केला. एका सामन्यात दोन मेडन ओव्हर टाकणारा हर्षल आयपीएलच्या (IPL) इतिहासातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी त्याचाच सहकारी मोहम्मद सिराज याने ही अप्रतिम कामगिरी केली होती. विशेष म्हणजे सिराजने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही (KKR) हा विक्रम केला. 2020 मध्ये त्याने हा पराक्रम केला होता.
31 वर्षीय पटेलने चार षटकात केवळ 11 धावा दिल्या आणि दोन विकेट्सही घेतल्या. त्याने सलग दोन मेडन षटके टाकली आणि दोन्हीमध्ये विकेट्स घेतल्या. 12व्या षटकात हर्षलने चौथ्या चेंडूवर सॅम बिलिंग्सला विराटकडे झेलबाद केले. यानंतर त्याने त्याच्या पुढच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आंद्रे रसेलला विकेटच्या मागे झेलबाद करून दुसरे यश मिळवले. हर्षलने चार षटकात एकूण 19 डॉट बॉल टाकले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.