VIDEO: डिस्को लाईट्स अन् 'विरुष्का'चा नादखुळा डान्स! आरसीबीच्या बॅक-टू-बॅक विजयाचं तगडं सेलिब्रेशन; रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Anushka Sharma Dance Video: क्रिकेटचा किंग विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या एका खास व्हिडिओने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
Virat Kohli Anushka Sharma Dance Video
Virat Kohli Anushka Sharma Dance Dainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Anushka Sharma Dance Video: आयपीएल 2026 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची विजयी मोहीम एका अविस्मरणीय उत्सवात बदलली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने 5 गड्यांनी दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयासह आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या महाविजयानंतर मैदानावर आणि मैदानाबाहेरही जल्लोषाला उधाण आले, पण या सगळ्यामध्ये क्रिकेटचा किंग विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या एका खास व्हिडिओने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

सामन्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत 'आफ्टर-पार्टी'मध्ये जेव्हा आरसीबीचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि त्यांचे कुटुंबीय विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र जमले, तेव्हा विराट आणि अनुष्का देखील या सेलिब्रेशनमध्ये पूर्णपणे बुडून गेले. आरसीबीच्या वतीने अधिकृतपणे जारी करण्यात आलेल्या फुटेजमध्ये हे कपल अत्यंत आनंदी मुडमध्ये एकत्र डान्स करताना आणि या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेताना दिसले.

या व्हिडिओमध्ये विराट केवळ अनुष्कासोबतच नाही, तर आरसीबीच्या कोचिंग स्टाफमधील सदस्यांसोबत आणि संघाचा फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिकसोबतही गळ्यात गळे घालून नाचताना दिसला. या आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे आरसीबीच्या इतिहासातील या नव्या सुवर्णकाळाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले.

Virat Kohli Anushka Sharma Dance Video
Virat Kohli Lizlaz Controversy: "विराटची बदनामी करण्यासाठी मला पैशांचं आमिष दाखवलं" जर्मन मॉडेलचा खळबळजनक खुलासा

आरसीबीच्या या सलग दुसऱ्या विजेतेपदामुळे हा संघ आयपीएलच्या इतिहासात सलग दोनदा जेतेपद राखणाऱ्या मोजक्या आणि यशस्वी संघांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला. कर्णधार रजत पाटीदारच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली आरसीबीच्या गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखले. त्यानंतर आरसीबीच्या फलंदाजांनी अवघ्या 2 षटके शिल्लक ठेवून हे लक्ष्य अतिशय सहजपणे पार केले आणि मैदानात एकच जल्लोष सुरु झाला. एकीकडे क्रिकेट जगतात आरसीबीच्या या बॅक-टू-बैकी कामगिरीचे कौतुक होत असताना, दुसरीकडे चाहत्यांसाठी विराट आणि अनुष्काचा डान्स सर्वात मोठा हायलाईट ठरला.

Virat Kohli Anushka Sharma Dance Video
Virat Kohli Golden Duck: किंग इज बॅक... पण शून्यावर! कोहलीकडून 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नकोशा विक्रमीची पुनरावृत्ती

या संपूर्ण सेलिब्रेशनमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) परिधान केलेल्या एका टी-शर्टने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ज्यावर एक मजेशीर संदेश लिहिलेला होता. विराटच्या टी-शर्टवर ''One Felt Nice, We Did Twice असा मजकूर होता, ज्यातून त्याने आरसीबीच्या सलग दोन जेतेपदांचा संदर्भ देत विरोधकांना एक प्रकारे चोख उत्तर दिले. हा संदेश आणि विरुष्काची केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर तुफान शेअर केली जात असून, आरसीबीच्या चाहत्यांसाठी आयपीएल 2026 चा हा समारोप खरोखरच संस्मरणीय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com