Ravindra Jadeja: जड्डूची विकेट्सची 'डबल सेंच्युरी'! 'असा' पराक्रम करणारा बनला दुसराच भारतीय

IND vs BAN: रविंद्र जडेजाने आशिया चषकात बांगलादेशविरुद्ध खेळताना मोठा पराक्रम करत कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaTwitter/BCCI

Asia Cup 2023, India vs Bangladesh, Ravindra Jadeja 200 wickets in ODI Cricket Record:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोर फेरीतील सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी (15 सप्टेंबर) होत आहे. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे आव्हान ठेवले आहे. याच सामन्यादरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठा विक्रम केला आहे.

जडेजाने या सामन्यात भारताकडून 10 षटके गोलंदाजी करताना 53 धावा देत 1 विकेट घेतली. जडेजाने शमिम हुसैनला बाद केले. ही त्याचे वनडे कारकिर्दीतील 200 वी विकेट ठरली आहे. दरम्यान, जडेजाच्या नावावर वनडेत 2500 पेक्षा अधिक धावा आहेत. त्यामुळे जडेजाने मोठा विक्रम केला आहे.

तो वनडे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स आणि 2500 पेक्षा अधिक धावा करणारा भारताचा केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम केवळ माजी कर्णधार कपिल देव यांना करता आला आहे. कपिल देव यांनी 225 वनडे सामने खेळताना 253 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 3783 धावा केल्या आहेत.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja - R Ashwin: जड्डू-अश्विन जोडगोळीच्या 500 विकेट्स! आता कुंबळे-हरभजनचा विक्रम धोक्यात

दरम्यान, जडेजा वनडेत 200 विकेट्स घेणारा भारताचा सातवाच गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी अनिल कुंबळे (337), जवागल श्रीनाथ (315), अजित अगरकर (288), झहिर खान (282), हरभजन सिंग (269) आणि कपिल देव (253) यांनी असा पराक्रम केला आहे.

दरम्यान, यातील कपिल देव यांच्याव्यतिरिक्त कोणालाही वनडेत 2500 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

Ravindra Jadeja
Glenn Maxwell: मॅक्सवेल झाला 'बापमाणूस'! पत्नी विनीने दिला मुलाला जन्म, नावाचाही केला खुलासा

जडेजाचा आशिया चषकातही विक्रम

जडेजा भारताचा आशिया चषक स्पर्धेतीलही सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने वनडे स्वरुपात झालेल्या या स्पर्धेत 19 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या आहेत. वनडे स्वरुपात होणाऱ्या आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये जडेजापाठोपाठ इरफान पठाण असून त्याने 12 सामन्यांत 22 विकेट्स घेतल्या आहेत.

श्रीलंकेचे भारताला 266 धावांचे आव्हान

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसनने 80 धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच तौहिद हृदोयने 54 धावांची खेळी केली, तर नसुम अहमदने 44 धावा केल्या आणि अखेरीस मेहदी हसनने नाबाद 29 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 265 धावा केल्या आणि भारतासमोर 266 धावांचे आव्हान ठेवले.

भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com