Ravindra Jadeja: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जडेजाचा आणखी एक रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Ravindra Jadeja, WTC: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak

Ravindra Jadeja, WTC: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सध्या तो मॅचविनिंग कामगिरी करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेवर भारताने कब्जा केला, रवींद्र जडेजानेही यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मात्र, रांची कसोटीत जडेजा फलंदाजीत चमकदार कामगिरी करु शकला नसला तरी त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने इंग्लंडच्या खेळाडूंना घायगुतीला आणले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात जडेजाने 4 विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी, दुसऱ्या डावात त्याला 1 बळी मिळाला. या एका विकेटसह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला.

जडेजा पहिला खेळाडू ठरला

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत जडेजाने दोन डावांत 12 आणि 4 धावा केल्या. गोलंदाजी करताना त्याने 4+1 म्हणजेच एकूण 5 विकेट घेतल्या. या विकेट्ससह जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आणि त्याने एक मोठी कामगिरीही केली. 35 वर्षीय जडेजा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत जडेजापूर्वी कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Reaction: वडिलांच्या आरोपांवर रवींद्र जडेजाची प्रतिक्रिया; म्हणाला, ''त्यांनी जे सांगितले ते...''

WTC मधील ही कामगिरी

दुसरीकडे, जडेजाच्या नावावर भारतासाठी 30 WTC सामन्यांमध्ये 1536 धावा आणि 100 विकेट आहेत. ही कामगिरी करण्यात त्याच्या जवळ टीम इंडियाचा अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आहे, ज्याने 34 कसोटी सामन्यांमध्ये 165 विकेट घेतल्या आहेत आणि 948 धावा केल्या आहेत. धर्मशाला येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने 52 धावा केल्या तर हा पराक्रम करणारा तो जडेजानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील दुसरा खेळाडू ठरेल.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Record: सर जडेजाने मोडला 27 वर्ष जुना रेकॉर्ड, अनिल कुंबळेला सोडले मागे; कुलदीप यादवही शर्यतीत

या 10 गोलंदाजांनी 100 हून अधिक विकेट घेतल्या आहेत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात एकूण 10 गोलंदाजांनी 100 किंवा त्याहून अधिक फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवले आहे. या 10 जणांमध्ये जडेजा, अश्विन आणि जसप्रीत बुमराहसह तीन भारतीयांचा समावेश आहे. नॅथन लियॉन, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी डब्ल्यूटीसीच्या इतिहासात 100 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत, तर इतर चार गोलंदाज - जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड (दोन्ही इंग्लंड), दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा आणि न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टिम साऊदी यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com