Ravindra Jadeja Reaction:
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने वडिलांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. जडेजाचे वडील अनिरुद्ध जडेजा यांनी जडेजा आणि त्याच्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, 'जडेजा माझ्याशी बोलत नाही. सुमारे 5 वर्षांपासून तो वेगळा राहत आहे.' जडेजाच्या वडिलांनी असे अनेक आरोप केले आहेत. यानंतर आता रवींद्र जडेजानेही यावर लगेच आपली प्रतिक्रिया दिली. निवेदन देताना जडेजाने पत्नीला निर्दोष घोषित केले आणि या सर्व गोष्टी निराधार असल्याचे म्हटले. चला तर मग वडिलांच्या वक्तव्यावर रविंद्र जडेजाने काय म्हटले ते जाणून घेऊया...
रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सांगितले की, ''माझ्या वडिलांनी मुलाखतीत जे काही सांगितले त्याला काही अर्थ नाही. मी या सर्व गोष्टी नाकारतो. त्यांनी जे काही सांगितले ते एकतर्फी आहे. त्यांनी आपले मत मांडले आहे, पण दुसरी बाजू त्यांनी मांडलेली नाही. या सर्व गोष्टी निराधार आहेत.'' तो पुढे म्हणाला की, ''माझ्या वडिलांनी माझ्या गॉडमदरची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा मी निषेध करतो. मलाही खूप काही सांगायचे आहे, पण मला या गोष्टी सार्वजनिक करायच्या नाहीत.'' रवींद्र जडेजाने आपल्या इन्स्टाग्राम एक स्टोरी पोस्ट करत आपले म्हणणे मांडले.
रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध जडेजा यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ''गेल्या 5 वर्षांपासून मी माझ्या मुलापासून वेगळा राहतो. रवींद्रचे लग्न झाल्यापासून 2-3 महिने सर्व काही सुरळीत चालले होते, पण नंतर त्याच्या पत्नीने त्याला माझ्याविरुद्ध भडकवले. मला माहित नाही की, त्याच्या पत्नीने माझ्या मुलावर काय जादू केली की माझा मुलगा माझ्यापासून वेगळा झाला. माझा मुलगा आणि सून यांच्याशी आता संबंध नाहीत. ते मला फोन करत नाहीत आणि मी त्यांना फोन करत नाही. आम्ही दोघेही जवळपास 5 वर्षांपासून वेगळे राहत आहोत.''
रविंद्र जडेजाच्या वडिलांनी पुढे सांगितले होते की, ''जामनगरमध्ये 2 बीएचके फ्लॅटमध्ये मी एकटाच राहतो. मला 20 हजार रुपये पेन्शन मिळते आणि त्यावरच उदरनिर्वाह चालतो. एक काळ असा होता की, रविंद्रही माझ्यासोबत राहत होता, पण आता ते माझ्याशी दोघेही बोलत नाहीत. मी माझ्या मुलाला क्रिकेटर बनवले नसते किंवा माझ्या मुलाचे लग्न केले नसते तर बरे झाले असते. जर मी जडेजाशी लग्न केले नसते तर मला हे दिवस पाहावे लागले नसते.'' दुसरीकडे, जडेजाच्या वडिलांचे वक्तव्य सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, वडिलांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनीही जडेजाबद्दल चांगले-वाईट बोलण्यास सुरुवात केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.