IND vs SL: 100 व्या कसोटीत कोहली करणार 'विराट रिकॉर्ड'

मोहालीमध्ये कोहलीला (Virat Kohli) 38 धावा करता आल्या तर त्याच्या कसोटी कारकिर्दीत 8000 धावा पूर्ण करेल.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak

Virat Kohli 100th Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला मोहालीत सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. एकीकडे कोहली भारतासाठी 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणारा 12वा खेळाडू ठरणार आहे. तर दुसरीकडे आणखी एक मोठा विक्रम त्याची वाट पाहत आहे. मोहालीमध्ये कोहलीला (Virat Kohli) 38 धावा करता आल्या तर त्याच्या कसोटी कारकिर्दीत 8000 धावा पूर्ण करेल. असे केल्यास तो 8 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारतातील सहावा फलंदाज ठरेल. आतापर्यंत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman), राहुल द्रविड (Rahul Dravid), सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी 8 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. (If Kohli Can Score 38 Runs In Mohali He Will Complete 8000 Runs In His Test Career)

दरम्यान, मोहालीमधील कसोटी सामन्यात कोहलीने 38 धावा केल्या तर तो कसोटीत सर्वात जलद 8000 धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरणार आहे. सचिनने 154 व्या डावात हा पराक्रम केला होता. राहुल द्रविडने 158, सेहवागने 160 आणि गावस्करांनी 166 डावात 8000 धावा केल्या होत्या.

Virat Kohli
IND vs SL: विराटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 100 वा कसोटी सामना खेळणार!

तसेच, कोहलीला गेल्या 2 वर्षांपासून शतक झळकावता आलेले नाही. किंग कोहलीने 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. 2021 मध्ये घरच्या मैदानावरील शेवटच्या 5 कसोटींमध्ये, कोहलीने 26.00 च्या सरासरीने फक्त 208 धावा केल्या आहेत. 8 डावात तीन वेळा तो शून्यावर बादही झाला आहे.

शिवाय, विराट कोहलीने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) शेवटची कसोटी मालिका खेळली होती. त्यादरम्यान कोहलीने 3 कसोटीत 610 धावा केल्या होत्या, ज्यात त्याने सलग दोन द्विशतके (213 in Nagpur and 243 in Delhi) झळकावली होती. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतही त्याने सलग तीन शतके झळकावली आहेत. आता फक्त 4 मार्चची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com