अश्विननं इंग्लिश पत्रकाराचा केला 'फुटबॉल', मारली जोरदार 'किक'

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा हंगाम 26 मार्चपासून सुरू होत आहे. याआधीच या लीगबाबत लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwintwitter
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा हंगाम 26 मार्चपासून सुरू होत आहे. याआधीच या लीगबाबत लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. लॉरेन्स बूथ (Lawrence Booth) या इंग्लंडच्या क्रीडा पत्रकाराने मात्र यंदाच्या लीगवर टीका केली होती, त्यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या फॉरेन पत्रकाराला 'फुटबॉल' करून अश्विनने प्रतिउत्तर देऊन जोरदार किकच मारली आहे.

लॉरेन्स बूथने सोशल मीडियावर ट्विट करून आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत टीका केली होती. त्याने लिहिले की आयपीएलचे वेळापत्रक क्रिकेटच्या कॅलेंडरच्या एक षष्ठांश म्हणजे सुमारे दोन महिने घेते. याला उत्तर देताना अश्विनने सांगितले की, इंग्लिश प्रीमियर लीग ही फुटबॉल स्पर्धा 6 महिने चालते. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, लॉरेन्स बूथने ट्विट करून आयपीएलच्या वेळापत्रकाची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की ही लीग वर्षाचा एक तृतीयांश भाग घेते. इंग्लिश प्रीमियर लीग देखील आहे. ती सहा महिने चालते. मात्र, त्यात खेळाडूंना दोन सामन्यांमध्ये थोडा वेळ मिळतो. ज्यात आठवड्यातून एक किंवा दोन सामने खेळले जातात.

Ravichandran Ashwin
IND vs SL: विराटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 100 वा कसोटी सामना खेळणार!

आयपीएलमध्ये क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याची क्षमता आहे

सध्या त्या उच्च स्तरापर्यंत (फुटबॉल) पोहोचणे क्रिकेटसाठी अवघड आहे. यावरही अनेक प्रश्नचिन्ह आहेत. मात्र, आयपीएल ही एक लीग आहे ज्यात क्रिकेटला उच्च पातळीवर नेण्याची पूर्ण क्षमता आहे. सर्व क्रिकेट चाहते, प्रेक्षक, क्रिकेट खेळणारे देश आणि संबंधितांना हे आधीच माहीत आहे. या आयपीएलमुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा जागतिक स्पर्धांचे उर्वरित स्वरूप देखील लहान होऊ शकते.

Ravichandran Ashwin
IND vs SL: 100 व्या कसोटीत कोहली करणार 'विराट रिकॉर्ड'

यावेळी रविचंद्रन अश्विन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना दिसणार आहे. राजस्थान संघाने त्याला मेगा लिलावात 5 कोटींची बोली लावून विकत घेतले आहे. अश्विन गेल्या मोसमापर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसला होता. मात्र यावेळी दिल्ली संघाने त्याला रिटेन केले नाही. अश्विनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 167 सामने खेळले असून त्यात त्याने 145 विकेट घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com