अश्विनचा मोठा खुलासा, क्रिकेटला अलविदा करण्याचा केला होता विचार!

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) कसोटीत बळींच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे.
Ravichandran Ashwin

Ravichandran Ashwin

Dainik Gomantak 

Published on
Updated on

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) कसोटीत बळींच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये जिथे जिथे स्पिनर आहे, तिथे अश्विनची गुणवत्ता त्यांच्यात उच्च दर्जाची आहे. आता त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही पुनरागमन केले आहे. पुनरागमनातच त्याने आपल्या कामगिरीच्या माध्यमातून सिध्दता दाखवली आहे. परंतु, प्रश्न असा आहे की, 3 वर्षांपूर्वी अश्विनला अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार का केला? आम्ही नाही तर खुद्द अश्विनने (Ravichandran Ashwin) 'द क्रिकेट मंथली' ला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले आहे. त्याने मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर नाराज होतो, त्यामुळे मी क्रिकेट सोडण्याचा विचार सुरु केला होता.

दरम्यान, संघ व्यवस्थापनाने असे काय केले जे की, अश्विनने क्रिकेटला अलविदा करण्याचा विचार केला होता. यावर अश्विनच्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास ते त्याच्या हेतूवर शंका घेत होते. त्याच्या क्रिकेटवरील निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ते त्याला वारंवार लक्ष्य करत होते, त्यामुळे तो अश्विन नाराज झाला होता. अश्विनच्या म्हणण्यानुसार, व्यवस्थापनाचा हा भेदभाव 2018 ते 2020 पर्यंत त्याच्यासोबत राहिला. आणि, हा तो काळ होता ज्या दरम्यान त्याने अनेक प्रसंगी क्रिकेटला अलविदा करण्याचा विचार केला.

<div class="paragraphs"><p>Ravichandran Ashwin</p></div>
प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामने होणार

संघ व्यवस्थापनाच्या वागण्यावर अश्विन नाराज होता

आपल्या मुलाखतीत इंग्लंडने (England) या दोन मालिकेचा उल्लेख केला जेव्हा त्यांना बेजबाबदारपणे वागणूक दिली गेली. यामध्ये 2018 साली इंग्लंडमध्ये खेळली गेलेली कसोटी मालिका आणि त्यानंतर त्याच वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात (Australia) खेळली गेलेली कसोटी मालिका समाविष्ट होती. तो म्हणाला की, त्या काळात मी ज्या व्यक्तीशी बोलायचो ती माझी पत्नी होती. अश्विनच्या म्हणण्यानुसार, टीम मॅनेजरचे असे वागणे असे होते, जे फक्त त्याच्यासोबतच घडत होते. तो टार्गेट होता आणि व्यवस्थापनाला तसे करणे आवडले असावे.

या कारणांमुळे अश्विनने क्रिकेट सोडण्याचा विचार केला

अश्विन म्हणाला, 2018 ते 2020 दरम्यान असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटले की, मी क्रिकेट सोडावे. मी करत असलेल्या कष्टाचे फळ मिळाले नाही. वास्तविक, त्या काळात गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत असलेल्या अश्विनकडे निवृत्तीचा विचार करण्याची अनेक कारणे होती. प्रथम त्याला असे वाटले की, माझ्या आसपासचे लोक दुखापतीबद्दल गंभीर नाहीत. दुसरे त्याला असे वाटले की, जर इतरांसाठी आधार असेल तर मला का नाही? मी काही कमी केले नाही. संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. तरीही मला तो आधार का नाही. मात्र, लोकांनी येऊन मला मदत करावी, असा विचार करणारा मी त्यांच्यापैकी नाही. त्यांनी माझ्या हेतूंचा गैरसमज करुन घेऊ नये अशी माझी इच्छा होती. भारतीय ऑफस्पिनरच्या मते, हीच ती वेळ होती जेव्हा त्याने काहीतरी वेगळं करण्याचा आणि त्यात आणखी चांगलं करण्याचा विचार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com